वादांची मल्लिका माधुरी दीक्षित

आज बाॅलिवूडची सौंदर्यवती माधुरी दीक्षितचा वाढदिवस. ती 49 वर्षांची झाली.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: May 15, 2017 02:47 PM IST

वादांची मल्लिका माधुरी दीक्षित

15 मे : आज बाॅलिवूडची सौंदर्यवती माधुरी दीक्षितचा वाढदिवस. ती 49 वर्षांची झाली. 1984मध्ये रिलीज झालेला 'अबोध' ते 'गुलाब गँग' माधुरीनं आपल्या करियरमध्ये अनेक चढउतार पाहिले. तिचा सहजसुंदर अभिनय तर होताच, पण माधुरी अनेक गोष्टींमुळे चर्चेत राहिली.  अनेक अभिनेत्यांसोबत तिचं नाव जोडलं गेलं. नजर टाकूया अशाच काही गोष्टींवर

अनिल कपूरसोबतची जवळीक

माधुरी दीक्षित आणि अमिताभ बच्चन यांनी सिनेमात एकत्र काम करावं म्हणून अनेक निर्माते प्रयत्नशील होते. पण फक्त डेव्हिड धवनचा 'छोटे मियाँ बडे मियाँ' सिनेमा सोडला, तर बाकीचे बिग बींसोबतचे सिनेमे माधुरीनं नाकारले. आणि असं म्हणतात याचं कारण होतं अनिल कपूर. अनिल कपूरला 'नेक्स्ट अमिताभ बच्चन' म्हटलं जायचं.

अनिल कपूर आणि बिग बीमध्ये अटीतटीची स्पर्धा होती. आणि म्हणूनच माधुरी बिग बींसोबतचं काम टाळायची. अनिल कपूरबरोबरचे तिचे सिनेमेही गाजत होते. पण चर्चा फारच व्हायला लागली, तसे तिने अमिल कपूरबरोबरचे संबंध तोडून टाकले.

Loading...

'दयावान'ची काँट्रोवर्सी 

'दयावान'मधल्या माधुरी आणि विनोद खन्ना यांच्यातल्या किसिंग सिनवर खूप टीका झाली. जास्त करून माधुरी दीक्षितवर टीकेची झोड उडाली होती. माधुरीनं फिरोज खानला ते दृश्य हटवण्यासाठी जोर टाकला. पण फिरोज खाननं स्पष्ट नकार दिला. त्यानं तिनं केलेलं काँट्रॅक्टही पुढे केलं. सार्वजनिक ठिकाणी अनेकदा माधुरीनं त्या दृश्याबद्दल खेदही व्यक्त केलाय.

संजय दत्तबरोबर रोमान्स

1990मध्ये माधुरी दीक्षित आणि संजय दत्त यांच्यातला रोमान्स चांगलाच गाजत होता. बाॅलिवूडमधली ती हाॅट जोडी मानली जायची. यामुळे माधुरीचे पालकही नाराज होते. नंतर संजय दत्त तुरुंगात गेला आणि त्यांचे प्रेमसंबंध संपुष्टात आले.

श्रीदेवी आणि जूही चावलाबरोबर कॅट फाईट

माधुरी आणि श्रीदेवीमध्ये विस्तव जायचा नाही.  श्रीदेवीनं नकार दिलेले सिनेमे माधुरीच्या करियरमधले माइलस्टोन ठरले. 'बेटा' हा त्यातला एक. त्या सिनेमानंतर माधुरीची धक धक गर्ल म्हणून ओळख झाली. माधुरीनं श्रीदेवीबरोबर सिनेमे करण्यात नकार दिला. या स्पर्धेत जूही चावलाचंही नाव आलं. जूहीनं तर या स्पर्धेला बालिशपणा म्हटलेलं.

महाराष्ट्राच्या ब्रँड अँबेसिडरचा वाद

महाराष्ट्र सरकार माधुरीला ब्रँड अँबेसिडर करणार होती. पण असं म्हणतात, तिनं 10 कोटी मागितले.

अनेक वादविवादात अडकूनही माधुरीनं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंच. आणि आजही तिच्याबद्दल आदर आहेच. माधुरीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 15, 2017 12:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...