S M L
Football World Cup 2018

जस्टिन बिबरवर भेटवस्तूंचा वर्षाव

जस्टिन बिबर मुंबईत होणाऱ्या कॉन्सर्टसाठी भारतात आलाय. त्याच्या स्वागतासाठी संपूर्ण देश सज्ज झालाय. अनेकजण आता त्याच्यावर भेटवस्तूंचा वर्षाव करू लागलेत.

Sonali Deshpande | Updated On: May 10, 2017 11:10 AM IST

जस्टिन बिबरवर भेटवस्तूंचा वर्षाव

 10 मे : जस्टिन बिबर मुंबईत होणाऱ्या कॉन्सर्टसाठी भारतात आलाय. त्याच्या स्वागतासाठी संपूर्ण देश सज्ज झालाय. अनेकजण आता त्याच्यावर भेटवस्तूंचा वर्षाव करू लागलेत.

या लिस्टमध्ये संगीतकार  अमजद अली खान यांसारख्या दिग्गजांचाही समावेश आहे. अमजद अली खान यांच्याकडून जस्टिनला सरोद भेट देण्यात येणारेय.

अमजद अली खान म्हणाले, 'जस्टिन हा या पिढीचा रोल मॉडल आहे आणि चाहत्यांचं त्याने मिळवलेलं प्रेम हे थक्क करणारेय. तो पहिल्यांदाच भारतात येतोय म्हणूनच एका कलाकाराकडून त्याला ही भेट आहे.'

जस्टिनला एक जॅकेट रोहित बाल यांच्याकडून भेट देण्यात येणारेय, ज्यामध्ये भारतातील विविध वाद्यांचे घटक आणि 10,000  सरोवस्की क्रिस्टलचं भरतकाम केलं गेलंय.

याबरोबरच ध्रुव कपूर  शूज, हूडी, शर्ट या गोष्टीदेखील जस्टिनला भेट देण्यात येणारेत.

विशेष म्हणजे ऋषी कपूर यांच्या मुलीकडून जस्टिनच्या आईसाठी गळ्यातला हार गिफ्ट म्हणून देण्यात येईल.

एकूणच काय तर जस्टिनच्या सुविधांच्या मागणीची यादी जशी मोठीय, तशीच त्याला देण्यात येणाऱ्या भेटवस्तूंचीही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 10, 2017 11:10 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close