17 वर्षांनंतर भारताला सौंदर्याचा 'मुकूट', मानुशी छिल्लर यंदाची मिस वर्ल्ड !

17 वर्षांनंतर भारताला सौंदर्याचा 'मुकूट', मानुशी छिल्लर यंदाची मिस वर्ल्ड !

'हरियाणाची छोरी' मानुशी छिल्लरनं यंदाचा मिस वर्ल्ड 2017 चा किताब पटकावलाय. तब्बल ११८ देशांमधल्या सौंदर्यवतींना मागे टाकून मानुशींनी विजयी मुकूट परिधान केलाय.

  • Share this:

18 नोव्हेंबर : तब्बल 17 वर्षांनंतर सौंदर्य स्पर्धेत भारताने पुन्हा एकदा इतिहास रचलाय. 'हरियाणाची छोरी' मानुशी छिल्लरनं यंदाचा मिस वर्ल्ड 2017 चा किताब पटकावलाय. तब्बल  ११८ देशांमधल्या सौंदर्यवतींना मागे टाकून मानुशींनी विजयी मुकूट परिधान केलाय.  या आधी 2000 मध्ये प्रियंका चोप्राने मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकली होती.

चीनमधील सान्या इथं यंदाची मिस वर्ल्ड 2017 स्पर्धेचा अंतिम सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. यंदाच्या या स्पर्धेत 118 देशातून सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता. मानुशीने सर्वांना मागे टाकत तिने मिस वर्ल्डचा ताज जिंकला. या स्पर्धेत मानुशीला 2016 ची मिस वर्ल्ड राहिलेली प्युर्टो रिकोच्या स्टेफनी डेल वेलने मिस वर्ल्डचा मुकूट घातला.

कोण आहे मानुशी छिल्लर ?

20 वर्षीय मानुशी ही हरियाणा येथील रहिवासी आहे. मानुशी सध्या वैद्यकीय शिक्षण घेत आहे. मानुशीनं याआधी मिस हरियाणाचा किताब जिंकला होता. तसंच मानुशीनं यंदाचा फेमिना मिस इंडियाचा किताबही जिंकला होता. मानुशीही मिस वर्ल्ड स्पर्धेत 67 विजेती ठरली आहे. या स्पर्धेत द मिस मेक्सिको दुसऱ्या स्थानावर तर मिस इंग्लंडला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

या प्रश्नामुळे जिंकली मानुशी

मिस इंडिया मानुशीला इतर स्पर्धकाप्रमाणे एक प्रश्न विचारला गेला. कोणत्या व्यवसायात सर्वात जास्त पगार मिळाला पाहिजे आणि का ? असा सवाल मानुशीला विचारला गेला. यावर मानुशीने उत्तर दिलं की, "सर्वात जास्त मान आणि सन्मान हा आईला मिळाला पाहिजे. आणि राहिला प्रश्न पगाराचा तर आईला आपण पगार देऊ शकत नाही. तिला फक्त प्रेम, सन्मानच दिला पाहिजे."

1966 पर्यंत कोणत्याही आशियाई महिलेला मिस वर्ल्ड किताब मिळाला नव्हता. 1966 मध्ये रिता फारिया ने पहिल्यांदा मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर तीन दशकानंतर ऐश्वर्या रायने इतिहास रचत मिस वर्ल्डचा किताब जिंकला. ऐश्वर्यानंतर अनेक तरुणींनी मिस वर्ल्ड स्पर्धेत सहभाग घेतला होता. 2000 मध्ये प्रियंका चोप्रा आणि डायना हेडन 1997 ला मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकली होती. आता मिस वर्ल्ड स्पर्धा सर्वाधिक वेळा जिंकणाऱ्या देशाच्या यादीत भारताचा समावेश झालाय.

First published: November 18, 2017, 10:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading