अस्सा नवरा हवा गं बाई,म्हणतेय मानुषी छिल्लर!

अस्सा नवरा हवा गं बाई,म्हणतेय मानुषी छिल्लर!

मानुषीला कसा हवाय जोडीदार? त्यावर तिनं उत्तर दिलं ते असं. 'त्याची विनोदबुद्धी चांगली हवी. आणि तो बुद्धिमान हवा. '

  • Share this:

01 डिसेंबर : मानुषी छिल्लर मिस वर्ल्ड झाली आणि सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. तिनं सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. मोदींची भेट घेतली. ती तिच्या घरी हरियाणाला गेली. आणि मग जेव्हा तिनं मीडिया हाऊसला भेट दिली, तेव्हा पत्रकारांनी तिला महत्त्वाचा प्रश्न विचारला, तो म्हणजे जोडीदाराचा.

मानुषीला कसा हवाय जोडीदार?  त्यावर तिनं उत्तर दिलं ते असं. 'त्याची विनोदबुद्धी चांगली हवी. आणि तो बुद्धिमान हवा. '

त्याच्या दिसण्याबद्दलही तिला विचारलं गेलं. तेव्हा ती म्हणाली, 'लूक्स नंतर येतात. सुरुवातीला विनोदबुद्धी आणि बुद्धिमत्ता.'

मिस वर्ल्ड स्पर्धेत मानुषीनं दिलेल्या उत्तरानं सर्वांची मनं जिंकली होती. ब्युटी विथ ब्रेन असलेल्या मानुषीला बाॅलिवूडच्याही बऱ्याच आॅफर्स यायला लागल्यात.

First published: December 1, 2017, 4:50 PM IST

ताज्या बातम्या