मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'...या विचाराने अश्रू सुकवावे लागणार नाहीत'; मानसी नाईकच्या नव्या पोस्टने वेधलं नेटकऱ्यांतं लक्ष

'...या विचाराने अश्रू सुकवावे लागणार नाहीत'; मानसी नाईकच्या नव्या पोस्टने वेधलं नेटकऱ्यांतं लक्ष

मानसी नाईक

मानसी नाईक

गेल्या काही दिवसांपासून मानसी घटस्फोटाच्या चर्चांमुळे प्रकाश झोतात आहे. मानसी नाईकने नवरा प्रदीपबरोबर घटस्फोट घेत असल्याचं नुकतंच सांगितलं

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sayali Zarad

मुंबई, 26 नोव्हेंबर : 'वाट माझी बघतोय रिक्षावाला' या मराठी गाण्यानं अनेकांना वेड लावलेलं पहायला मिळालं. या गाण्यानं प्रसिद्धी झोतात आलेली मराठमोळी अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक. मानसी ही सोशल माध्यमांवर बरीच सक्रिय असते. ती अनेक ग्लॅमरस आणि हॉट फोटो शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधत असते. गेल्या काही दिवसांपासून मानसी घटस्फोटाच्या चर्चांमुळे प्रकाश झोतात आहे. मानसी नाईकने नवरा प्रदीपबरोबर घटस्फोट घेत असल्याचं नुकतंच सांगितलं. तेव्हापासून तिची प्रत्येक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

मानसी नाईकने नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिनं स्टॉंग वुमन विषयी असलेल्या ऑडिओवर रील बनवलं आहे. व्हिडीओ शेअर करत मानसीने लिहिलं, 'जेणेकरून आजपासून शंभर वर्षांनंतर एक दिवस दुसर्‍या बहिणीला इतिहासात तिचा आवाज कुठे हरवला या विचाराने तिचे अश्रू सुकवावे लागणार नाहीत. सशक्त महिलाच महिलांना सक्षम बनवतात.' तिच्या या व्हिडीओवर सध्या अनेक कमेंट पहायला मिळत आहे.

लग्नाच्या वर्षभरातच मानसी आणि प्रदीपमध्ये खटके उडाल्याचं दिसतंय.  मानसी नाईकने आपल्या सोशल मीडियावरून नवऱ्यासोबतचे सगळे फोटो हटवले आहेत. त्याचसोबत तिने खरेरा हे आडनाव देखील हटवलं आहे. दोघांच्या या निर्णयामुळे चाहते खूप नाराज आहेत.

घटस्फोटांच्या चर्चांवर मानसी नाईकनं म्हटलंय, हो घटस्फोटांच्या चर्चा खऱ्या आहेत. मी खोट बोलणार नाही. मी घटस्फोट घेण्यासाठी अर्ज दिला आहे. या प्रक्रियेला आता सुरूवात झाली आहे. मी आता या क्षणाला खूपच दु:खी आहे. यासगळ्यात नेमकं काय चुकलंय हे सांगणं आता माझ्यासाठी खूप कठीण आहे. आमच्यात काही गोष्टी ठिक होऊ शकल्या नाहीत. हे सगळं खूप वेगात घडलंय. पण मला माझ्या प्रेमावर आजही विश्वास आहे.

दरम्यान, मानसीने ‘एकता-एक पॉवर’, ‘कुटुंब’, ‘तीन बायका फजिती ऐका’, ‘जबरदस्त’, ‘मर्डर मेस्त्री’, ‘ढोलकी’, ‘हू तू तू’, ‘कोकणस्थ’ या चित्रपटाद्वारे आपले अभिनय कौशल्य दाखवले. एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच ती चांगली नृत्यांगनासुद्धा आहे. ‘बघतोय रिक्षावाला’ या गाण्याच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांना चागलंच याड लावले. ‘ढोलकीच्या तालावर’, ‘हॅलो बोल’, ‘मराठी तारका’ यासारख्या अनेक मराठी रियालिटी डान्सिंग शोच्या माध्यमातूनही मानसी प्रेक्षकांच्या भेटीला आली.

First published:

Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment