मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Mansi Naik : 'तुला पाहून मला घाम फुटला'; मानसीचा नवा व्हिडीओ आणि कुशलची ती कमेंट चर्चेत

Mansi Naik : 'तुला पाहून मला घाम फुटला'; मानसीचा नवा व्हिडीओ आणि कुशलची ती कमेंट चर्चेत

मानसी नाईक

मानसी नाईक

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री मानसी नाईक खूप चर्चेत आहे. मानसी तिचा पती प्रदीप खरेरासोबत घटस्फोट घेणार असल्यामुळे सध्या सोशल मीडियावर याचीच चर्चा पहायला मिळतेय.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sayali Zarad

मुंबई, 3 डिसेंबर : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री मानसी नाईक खूप चर्चेत आहे. मानसी तिचा पती प्रदीप खरेरासोबत घटस्फोट घेणार असल्यामुळे सध्या सोशल मीडियावर याचीच चर्चा पहायला मिळतेय. घटस्फोटाची चर्चा सगळीकडे पसरताच मानसीने स्वतः पोस्ट शेअर करत ती खरंच घटस्फोट घेणार असल्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब केला. तेव्हापासून मानसीची प्रत्येक पोस्ट सोशल मीडियावर काही क्षणातच व्हायरल होताना पहायला मिळते. अशातच मानसीने नवा व्हिडीओ शेअर केलाय आणि नेहमीप्रमाणेच व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरतोय. व्हिडीओ तर चर्चेत आहेच मात्र व्हिडीओवर आलेल्या एका कमेंटवरही सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

मानसी नाईकने तिच्या इन्स्टाग्रामवर एक वर्कआऊटचा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये मानसी तिच्या शरीरावर खूप मेहनत घेत असल्याचं दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून लोकप्रिय अभिनेता, विनोदवीर कुशल बद्रिकेही स्वतःला कमेंट करण्यापासून रोखू शकला नाही. मानसीच्या व्हिडीओवर कुशलने कमेंट करत म्हटलं, 'मला तर तुझी मेहनत बघूनच घाम आला. बापरे, खतरनाक'. मानसीची ही पोस्ट आणि कुशलची ती कमेंट सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे.

मानसीच्या या पोस्टवर नेटकरीही अनेक कमेंट करत आहेत. 'स्त्री ही सर्वात जास्त शक्तीशाली असते मानसिक दृष्ट्या ही आणि शारीरिक दृष्ट्या ही. फक्त तिला हे समजल पाहिजे, अनस्पॉपेबल मुलगी, स्पर्धेत टिकून राहणेसाठी मेहनतीने उभे राहणे गरजेचे आहे. ते तू अगदी मनापासून करत आहेस. यशस्वी वाटचालीस शुभेच्छा, स्ट्रॉग गर्ल आणि सुंदर हृदय', अशा अनेक प्रकारच्या कमेंट व्हिडीओवर येत आहेत.

दरम्यान, मानसी आणि प्रदीप 19 जानेवारी 2021 रोजी विवाहबंधनात अडकले. त्यापूर्वी अनेक वर्ष मानसी आणि प्रदीप एकमेकांना डेट करत होते. दोघेही सतत सोशल मीडियावर सक्रिय असायचे. एकमेकांविषयीचे प्रेम व्यक्त करत असायते. मात्र अचानक दोघांमध्ये काहीतरी बिनसलं आणि त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. मानसी आणि प्रदीपमध्ये अचानकपणे उडालेले खटके पाहून चाहत्यांनाही मोठा धक्का बसला. अखेर दोघं लवकरच घटस्फोट घेणार आहेत.

First published:

Tags: Entertainment, Marathi actress, Marathi cinema, Marathi news