मुंबई, 15 जानेवारी- बघतोय रिक्षावाला फेम अभिनेत्री मानसी नाईक (mansi naik ) सोशल मीडियावर नेहमी अॅक्टीव असते. नवरा प्रदीप खरेरा (pardeep kharera) याच्यासोबतचे काही फोटो व व्हिडिओ देखील ती सोशल मीडियावर शेअर करत असते. आता मानसी नाईकच्या लग्नाला या 19 जानेवारीला (First Marriage Anniversary) एक वर्ष पूर्ण होत आहे. मग या पहिल्या वहिल्या लग्नाच्या वाढदिवसासाठी मानसीनं (mansi naik and pardeep kharera first marriage anniversary) खास तयारी देखील सुरू केली आहे. तिनं याचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.
मानसी नाईकने इन्स्टावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ एका टॅटू हाऊसचा आहे. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त मानसी आणि प्रदिपने एमजमेंट रिंग घातलेल्या बोटावर एक टॅटू गोंदवून घेतला आहे. प्रदिपच्या बोटावर क्वीनचा तर मानसीच्या बोटावर किंगचा टॅटू (first couple tatto) गोंदवण्यात आला आहे.
वाचा-नव्या मालिकेला कोरोनाचा धस्का! 'पिंकीचा विजय असो'च्या वेळापत्रकात बदल
मानसी नाईकने या व्हिडिओला एक सुंदर कॅप्शन देखील दिली आहे. तिनं म्हटलं आहे की, 19 जानेवारीला आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे. आम्ही ठरवले होते की, यानिमित्त दोघांनीही एकमेंकाना काहीतरी सुंदर वचन द्यायचे. म्हणून आम्ही ठरवले की, दोघांनी मिळून एक सुंदर साम्राज्य निर्माण करायचे. जशी की या जगाच तो माझं जग आहे. असं म्हणत तिंन राजा-राणी असं देखील म्हटलं आहे. शिवाय तिनं आमच्या दोघांचा पहिला कपल टॅटू असं देखील म्हटलं आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांकडून आताच कमेंटचा पाऊस सुरू झाला आहे.
View this post on Instagram
मानसी नाईकने मागील वर्षी 19 जानेवारीला बॉक्सर प्रदीप खरेरा याच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. दोघेही सोशल मीडियावर विविध फोटो तसेच व्हिडिओ शेअर करत असतात. दोघांचाही सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. या दोघांच्या लग्नाची देखील सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली होती.
मानसी नाईकने ‘एकता-एक पॉवर’, ‘कुटुंब’, ‘तीन बायका फजिती ऐका’, ‘जबरदस्त’, ‘मर्डर मेस्त्री’, ‘ढोलकी’, ‘हू तू तू’, ‘कोकणस्थ’ या चित्रपटाद्वारे आपले अभिनय कौशल्य दाखवले. एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच ती चांगली नृत्यांगनासुद्धा आहे. ‘बघतोय रिक्षावाला’ या गाण्याच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांना चागलंच याड लावले. ‘ढोलकीच्या तालावर’, ‘हॅलो बोल’, ‘मराठी तारका’ यासारख्या अनेक मराठी रियालिटी डान्सिंग शोच्या माध्यमातूनही मानसी प्रेक्षकांच्या भेटीला आली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.