अभिनेत्याच्या हत्येचा तपास करणार मानसी साळवी; 13 वर्षांनी छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक

अभिनेत्याच्या हत्येचा तपास करणार मानसी साळवी; 13 वर्षांनी छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक

अभिनेत्री मानसी साळवी (Mansi Salvi) तब्बल 13 वर्षांनी काय घडलं त्या रात्री या मालिकेतून कमबॅक करणार आहे.

  • Share this:

मुंबई, 19 डिसेंबर: झी मराठीवरील (Zee Marathi) असंभव मालिकेतील शुभ्रा आठवतेय? हो आम्ही बोलत आहोत मानसी साळवीबद्दल (Mansi Salvi). तिने साकारलेली शुभ्राची भूमिका, तिचा अभिनय प्रेक्षकांना अतिशय आवडलं होता. आता तीच मानसी साळवी तब्बल 13 वर्षांनी छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. 'काय घडलं त्या रात्री?' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मानसीने या आधी झी मराठीवरील सौदामिनी आणि नुपूर या मालिकांमध्ये काम केलं आहे.

काय घडलं त्या रात्री? या मालिकेमध्ये मानसी साळवी एका आयपीएस (IPS) अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या हत्येचा तपास करण्याची जबाबदारी तिच्यावर सोपवण्यात येते. हुशार आणि चलाख पोलीस ऑफिसर तिच्या पद्धतीने या हत्येचा तपास कसा करते हे या मालिकेमध्ये दाखवण्यात येणार आहे. राजकारण्यांच्या दबावासमोर न झुकता काम करणारी महिला अशी तिची ओळख असते.

मानसी साळवी भूमिकेबद्दल काय म्हणाली?

IPS अधिकाऱ्याच्या नव्या भूमिकेबद्दल बोलताना मानसी साळवी म्हणाली, 'प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं की अशी पद्धतीची दमदार भूमिका आपल्याला साकारयला मिळावी. त्या रात्री काय घडलं या मालिकेत मी रेवती बोरकर या आयपीएस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. ही भूमिका साकारता मला अतिशय आनंद वाटत आहे. कणखर अधिकारी आणि प्रेमळ आई अशा दुहेरी भूमिकेमध्ये मी तुम्हाला दिसणार आहे. आज 13 वर्ष झाल्यानंतरही माझी कारकिर्द प्रेक्षकांच्या लक्षात आहे ते मला आपुलकीने प्रोत्साहन देतात याबद्दल मी त्यांची ऋणी आहे.'

Published by: Amruta Abhyankar
First published: December 19, 2020, 11:19 AM IST

ताज्या बातम्या