मनोज वाजपेयी पाळतोय श्रावण, ईदला नाही खाणार बिर्याणी

मनोज वाजपेयी पाळतोय श्रावण, ईदला नाही खाणार बिर्याणी

बाॅलिवूड अभिनेता मनोज वाजपेयीच्या गली गुलिया सिनेमाचं पोस्टर रिलीज झालं. त्यावेळी त्यानं न्यूज18शी खास बातचीत केली.

  • Share this:

शिखा धारीवाल, प्रतिनिधी

मुंबई, 22 आॅगस्ट : बाॅलिवूड अभिनेता मनोज वाजपेयीच्या गली गुलिया सिनेमाचं पोस्टर रिलीज झालं. त्यावेळी त्यानं न्यूज18शी खास बातचीत केली. या सिनेमासाठी मनोजला असंख्य पुरस्कारही मिळालेत. गली गुलिया हा एक सायकोलाॅजिकल ड्रामा आहे. छोट्यांवर होणारे गुन्हे, अत्याचार यावर हा सिनेमा आहे.

एकूणच वाढत्या गुन्हेगारीबद्दल मनोज वाजपेयी अस्वस्थ होतोय. तो म्हणाला, ' लहान मुलं आणि स्त्रिया यांच्या बाबतीत घडणारे गुन्हे पाहून मी अस्वस्थ होतो. कमकुवत लोकांना या गुन्ह्यांना तोंड द्यावं लागतं, तेव्हा मला खूप अपराधी वाटतं. रात्रभर झोप येत नाही. आता केरळमध्ये पूर आलाय, त्याबद्दलही मी अस्वस्थ झालोय. कुठल्याही संकटाला लोकांना जे तोंड द्यावं लागतंय, यानं मी बेचैन होतो. ' मनोज खरोखर एक संवेदनशील अभिनेता आहे.

केरळमध्ये पूर आला कारण शबरीमल्लामध्ये स्त्रियांना प्रवेश दिला, असं काही जण म्हणतायत. यावर मनोज वाजपेयीला विचारलं तर तो म्हणतो, 'लोक कशा प्रकारे विचार करतात हे काही सांगता येत नाही. पण आज लक्ष एकाच गोष्टीवर द्यायला पाहिजे. ते म्हणजे केरळला आपण पुन्हा नव्यानं कसं उभं करू यावर. इतर गोष्टींकडे दुर्लक्ष केलं पाहिजे.

हेही वाचा

विक्रांतच्या आयुष्यात ईशा कसलं वादळ घेऊन येणार?

ट्विटरवर सलमान झाला ट्रोल, युजर्स म्हणतात, झोपला होतास का?

VIDEO : वरुण धवननं दिलं आपल्या वडिलांना खास गिफ्ट

मनोज वाजपेयी म्हणाला, तो बिहारमध्ये वाढलाय. बिहार शेतकऱ्यांचं राज्य आहे. सुंदर आहे. शहरांसारखं नाही. मनोज म्हणतो, ' माझं कुटुंब शेतकरी आहे. मी गावात जाऊन शेतीही करतो. या वर्षी मी आॅक्टोबरमध्ये जाणार.'

मनोज वाजपेयीच्या 'सत्यमेव जयते'द्दल कौतुक सुरू आहे. हा सिनेमा भ्रष्टाचाराविरोधात भाष्य करतो. मनोज म्हणतो, 'भ्रष्टाचार देशाच्या कोपऱ्या कोपऱ्यात पसरलाय. लोकांच्या डीएनएमध्येच तो असतो. तो तिथून जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत देश पुढे जाणार नाही.'

मनोज वाजपेयीला विचारलं की तुला कुठला स्टार आवडतो. त्यावर त्याचं उत्तर असं, 'मला माझे सगळेच सहकलाकार आवडतात. पण पहिली पसंत आहे शाहरूख खान.'

मनोजची पत्नी मुस्लिम आहे. त्यामुळे यावर्षी त्याच्या घरी ईद जोरात साजरी होणार आहे. पण तो म्हणाला, 'श्रावण असल्यामुळे तो यावर्षी बिर्याणी खाणार नाही.'

काही दिवसांपूर्वी मनोज वाजपेयी आणि तब्बूचा 'मीसिंग' रिलीज झाला होता. त्यातल्या त्याच्या भूमिकेचं कौतुक झालं होतं.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 22, 2018 12:45 PM IST

ताज्या बातम्या