मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

भोजपुरी सुपरस्टार मनोज तिवारींना झाली मुलगी; मराठीतून कॅप्शन देत शेअर केला फोटो

भोजपुरी सुपरस्टार मनोज तिवारींना झाली मुलगी; मराठीतून कॅप्शन देत शेअर केला फोटो

भोजपुरी इंडस्ट्रीतले सुपरस्टार आणि भाजप खासदार मनोज तिवारी (Manoj Tiwari) यांना मुलगी झाली आहे. तिवारींनी ट्विटरवरुन ही आनंदाची बातमी सगळ्यांना सांगितली आहे.

  • Published by:  Amruta Abhyankar
मुंबई, 31 डिसेंबर: भोजपुरी इंडस्ट्रीतले सुपरस्टार आणि भाजप खासदार मनोज तिवारी (Manoj Tiwari) यांना कन्यारत्न प्राप्त झालं आहे. मनोज तिवारींनी ट्विटवरुन ही गोड बातमी चाहत्यांना दिली. त्यांनी ट्विटमध्ये लिहीलं होतं, ‘मेरे घर आयी एक नन्ही परी... I am blessed with a baby girl...’ विशेष म्हणजे त्यांनी मराठीत 'जय जगदंबे' असंही आपल्या ट्वीटमध्ये लिहीलं आहे. तिवारी कुटुंबात सध्या आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. मनोज तिवारींनी त्यांच्या गोंडस मुलीसोबतचा एक फोटोही ट्विटरवर शेअर केला आहे. मनोज तिवारी यांना पहिली मुलगी आहे ती शिकण्यासाठी मुंबईत आली आहे. तिवारींनी भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. सध्या तिवारी उत्तर पूर्व दिल्लीचे खासदारही आहेत. तसंच दिल्ली भाजपचे अध्यक्षपदही ते भूषवत आहेत. भोजपुरी इंडस्ट्रीतले सुपरस्टार मनोज तिवारी यांच्या नावावर अनेक सुपरहिट चित्रपट आहेत. 'ससुराल बडा पैसावाला' या चित्रपटातून त्यांनी डेब्यू केला. त्यानंतर धरती काहे पुकार के, भोले शंकर, जनम जनम के साथ, ऐलान, अंधा अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. सध्या मनोज तिवारींवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अभिनेत्री डॉली बिंद्रा, भाजपचे हरीष खुराना अशा अनेक व्यक्तींनी त्यांचं अभिनंदन केलं आहे.
First published:

Tags: Small baby

पुढील बातम्या