ज्याचं गाणं गात रानू झाली सुपरस्टार, 'तो' रिअल हिरो मात्र राहिला दुर्लक्षित

ज्याचं गाणं गात रानू झाली सुपरस्टार, 'तो' रिअल हिरो मात्र राहिला दुर्लक्षित

‘एक प्यार नगमा...’ या गाण्यामुळे स्टार रानू तर स्टार झाली पण या गाण्याचा रिअल हिरो मात्र सध्याच्या घडीला दुर्लक्षित आहे.

  • Share this:

मुंबई, 29 ऑगस्ट : कधी काळी रानाघाटच्या रेल्वेस्टेशनवर गाणं गात भीक मागणारी रानू मंडल सध्या देशभरात चर्चेचा विषय बनली आहे. हिमेश रेशमियानं पहिला ब्रेक दिल्यानंतर रानू मंडल रातोरात स्टार झाली. संपूर्ण सोशल मीडियावर सध्या एकाच नावाची चर्चा आहे. ती म्हणजे रानू मंडल. स्टेशनवर गाणं म्हणत असताना तिनं कधी स्वप्नातही विचार केला नसेल की तिचं आयुष्य अशाप्रकारे बदलणार आहे. ‘एक प्यार नगमा...’ या गाण्यामुळे स्टार रानू तर स्टार झाली पण या गाण्याचा रिअल हिरो मात्र सध्याच्या घडीला दुर्लक्षित आहे.

रानू मंडलनं गायलेलं गाणं ‘एक प्यार नगमा...’ प्रसिद्ध गीतकार संतोष आनंद यांनी लिहिलं आहे. मात्र सध्या त्यांची दखल घ्यायला कोणीही नाही. या गोष्टीकडे सर्वांचं लक्ष वेधून घेत गीतकार  मनोज मुंतसिर यांनी नुकतंच एक ट्वीट केलं. त्यांनी लिहिलं, मला गोष्टीचा आनंद आहे की, रानू मंडल यांनी संतोष आनंद यांचं गाणं 'जिंदगी और भी कुछ भी नहीं तेरी मेरा कहानी है' गाणं गायलं आणि त्या रातोरात स्टार झाल्या मात्र कोणतं चॅनेल, कोणी म्यूझिक डायरेक्टर, कोणी सांताक्लॉज किंवा मग कोणी रॉबिन हुड संतोष आनंदीजींबद्दल काही बोलेल का?

31 Golden Years Of Salman Khan : भाईजानचे असे फोटो जे तुम्ही कधीच पाहिले नसतील!

मनोज मुंतसिर यांचं हे ट्वीट रिट्वीट करत टोनी कक्करनं लिहिलं, ‘खरं आहे मनोज जी. संतोष आनंद यांनी अनेक मास्टारपीस गाणी लिहिली आहेत. त्यामुळे ते खूप काही डिझर्व्ह करतात’ संतोष आनंद यांच्याबद्दल बोलायचं तर मागच्या काही काळापासून ते एक दुर्लक्षित आहेत. दैनिक भास्कर यांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार सध्या आपला रोजचा रोजीरोटीचा खर्च भागवण्यासाठी संतोष आनंद यांना लहान-मोठ्या कवी संमेलनांचा आधार घायावा लागत आहे.

घटस्फोटानंतर मलाकाच्या कुटुंबाशी असं आहे अरबाजचं नातं, अभिनेत्रीनं केला खुलासा

दैनिक भास्करशी बोलताना संतोष आनंद म्हणाले, ‘रोज कोणी ना कोणी फोन करत आणि तुम्ही लिहिलं गाणं गाऊन रेल्वे स्टेशनवर भीक मागणारी महिलेला हिमेश रेशमियानं आपल्या सिनेमासाठी गाण्याची संधी दिल्याचं सांगतं. माझ्याकडे स्मार्टफोन नाही त्यामुळे मी रानू मंडल यांचं गाणं ऐकू शकत नाही. सध्या फक्त जगतो आहे. माझ्या मुलाच्या मृत्यूनंतर आयुष्यातील सर्व रंगच पुसले गेले. ’

Oops! ‘पछताओगे’ सक्सेस पार्टीमध्ये नोरा फतेहीला ड्रेसनं दिला दगा, VIDEO VIRAL

संतोष आनंद यांनी आता पर्यंत 'मैं ना भूलूंगा', 'तेरा साथ है तो', 'मेघा रे मेघा', 'एक प्यार का नगमा है', मुहब्बत है क्या चीज' आणि 'जिंदगी की ना टूटे लड़ी' सारखी गाणी लिहिली आहेत. त्यांनी आतापर्यंत जवळापास 26 सिनेमांसाठी 109 गाणी लिहिली आहेत. संतोष आनंद यांनी 1974 पासून गाणी लिहायला सुरुवात केली. मात्र सध्या बॉलिवूडमधील अनेक लोकांचं म्हणणं आहे की संतोष आनंद सध्या गीतकार ज्या मनस्थितीत असायला हवा त्या मनस्थितीत नाहीत. इंडस्ट्रीमध्ये आतापर्यत असे अनेक गीतकार आहेत ज्यांनी इथं खूप मोठं योगदान दिलं आहे मात्र त्याच्या योगदानाप्रमाणं त्यांनी मान सन्मान किंवा महत्त्व मिळालेलं नाही.

===============================================================

SPECIAL REPORT: रानू यांच्या आवाजाने सलमानला अश्रू अनावर, केली 'ही' मदत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 29, 2019 09:42 AM IST

ताज्या बातम्या