या मुस्लिम अभिनेत्रीशी मनोज वाजपेयीने केलं होतं दुसरं लग्न

मनोज यांचं पहिलं लग्न दिल्लीतील एका मुलीशी झालं. पण हे लग्न स्ट्रगलच्या कठीण काळामुळे फारसं टिकू शकलं नाही.

News18 Lokmat | Updated On: Apr 23, 2019 10:11 AM IST

या मुस्लिम अभिनेत्रीशी मनोज वाजपेयीने केलं होतं दुसरं लग्न

सत्या, शूल, जुबैदा, पिंजर, अलीगढ यांसारख्या एकाहून एक सरस सिनेमात काम केलेल्या मनोज बाजपेयी आज २३ एप्रिलला आपला ५० वा वाढदिवस साजरा करत आहेत. आज सिनेसृष्टीत हरहुन्नरी अभिनयासाठी त्यांचं नाव आवर्जुन घेतलं जातं.

तुम्हाला हे माहीत आहे का, मनोज यांना नॅशनल स्कूल ऑफ ड्रामातून चारवेळा नकार देण्यात आला होता. एनएसडीकडून जरी त्यांच्या हाती निराशा लागली तर त्यांनी थिएटर करणं सोडलं नाही आणि १९९४ मध्ये द्रोहकाल सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

द्रोहकाल सिनेमानंतर त्यांनी याचवर्षी बँडिट क्वीनसारखा नेहमीच लक्षात राहणारा सिनेमा केला. पण या सिनेमांचा त्यांच्या करिअरला फारसा फायदा झाला नाही. जवळपास १९९८ मध्ये सत्या सिनेमाने त्यांना खरी ओळख मिळवून दिली. या सिनेमात त्यांनी गँगस्टर भीकू म्हात्रेची व्यक्तिरेखा साकारली होती. या सिनेमानंतर अनेकांना मनोज यांच्या अभिनयातील दम दिसला.

Loading...

आज जर एखादी दणदणीत व्यक्तिरेखा साकारायची असेल तर मनोज यांच्या नावाचा विचार केला जातो. पण या सर्व गोष्टी त्यांना सहज मिळाल्या नाहीत. मनोज यांचे वडील शेतकरी होते. उन्हाळ्यात मनोजही वडिलांसोबत शेती करायचे.

लहानपणापासूनच त्यांनी अभिनेता व्हायची स्वप्न पाहिली होती. याचमुळे वयाच्या १७ व्या वर्षी ते दिल्लीत आले. एनएसडीमध्ये शिक्षण न घेताही मनोज आज सर्वोच्च स्थानावर पोहचले हे तर साऱ्यांनीच पाहिलं.

मनोज बाजपेयी यांच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर तेही अगदी सिनेमाच्या कथेसारखी आहे. मनोज यांचं पहिलं लग्न दिल्लीतील एका मुलीशी झालं. पण हे लग्न स्ट्रगलच्या कठीण काळामुळे फारसं टिकू शकलं नाही आणि यश मिळण्याआधीच हे लग्न तुटलं. यानंतर मनोज यांची ओळख शबाना रजा यांच्याशी झाली.

करीब सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या शबाना यांना पाहताच मनोज त्यांच्या प्रेमात पडले. शबाना उर्फ नेहा नावाने ओळखल्या या अभिनेत्रीशी मनोज यांनी २००६ मध्ये लग्न केलं. दोघांना एक मुलगी आहे.

मनोज यांच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर, लव सोनिया, इन दी शॅडो, सोनचिडीया सत्यमेव जयते बागी- २, अय्यारी या सिनेमांमधल्या त्यांच्या कामाचं तुफान कौतुक करण्यात आलं. तसेच यावर्षी मनोज यांना राष्ट्रपतीद्वारा पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 23, 2019 09:54 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...