• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Mann zaal Bajind : राया कृष्णाच्या गाडीला अपघात, गुरुजींचे भाकीत खरे होणार?

Mann zaal Bajind : राया कृष्णाच्या गाडीला अपघात, गुरुजींचे भाकीत खरे होणार?

पहिला दिवाळसण म्हणून राया आणि कृष्णा घरच्यांबरोबर कुलदेवीच्या दर्शनाला जातात, पण येतना वाटेत राया-कृष्णाच्या गाडीला अपघात होतो.

 • Share this:
  मुंबई, 10 नोव्हेंबर- आजवर मालिकांमध्ये प्रेमाचा रंग गुलाबी असलेला आपण पाहिलाय. परंतु पहिल्यांदाच मन झालं बाजिंद ' (Mann zaal Bajind). या मालिकेत राया आणि कृष्णाच्या प्रेमकथेत पिवळ्या रंगाची उधळण प्रेक्षकांना पहायला मिळतेय. मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं कि नुकतंच राया आणि कृष्णाचं लग्न झालं. गुरुजींच्या भाकिताप्रमाणे रायाची पहिली बायको अल्पायुषी ठरणार आहे. लग्न होताच वऱ्हाडाच्या बसला अपघात होतो पण त्यातून कृष्णा वाचते. दिवाळीमध्ये देखील कृष्णाचा पदर पेट घेतो तेव्हा देखील राया तिला वाचवतो. पण पुढे काही अघटित घडलं तर त्यातून कृष्णा सुखरूप बाहेर पडेल का? हे पाहणं उत्कंठावर्धक ठरेल. नुकतंच मालिकेत राया-कृष्णाचा दिवाळीतला पहिला पाडवा साजरा होतो. कृष्णा भाऊसाहेबांना लग्नानंतरही कारखान्यावर जाणार असल्याचे सांगते, भाऊसाहेब तिला होकार देतात. पहिला दिवाळसण म्हणून राया आणि कृष्णा घरच्यांबरोबर कुलदेवीच्या दर्शनाला जातात, पण येतना वाटेत राया-कृष्णाच्या गाडीला अपघात होतो. वाचा :शाहरुख खान 'पठाण' च्या शूटिंगवर परतणार; अभिनेता स्पेनसाठी होणार रवाना कृष्णा गाडीतून बाहेर फेकली जाते आणि रायाला कृष्णा दिसेनाशी होते. कृष्णाच्या जीवाला असलेला धोका टळेल कि गुरुजींचं भाकीत खरं ठरेल? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.तेव्हा पाहायला विसरू नका मन झालं बाजींद झी मराठीवर. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ठरलेली मालिका म्हणजे 'मन झालं बाजिंद. या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांना आपलसं करुन घेतलं आहे. या मालिकेत अभिनेत्री श्वेता खरातने (shweta kharat) कृष्णा ही भूमिका साकारली आहे. तर वैभव चव्हाण(vibhav chavan) रायाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे
  Published by:News18 Trending Desk
  First published: