मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'फक्त 5 दिवस बाकी' म्हणत Hruta Durguleचा बॉयफ्रेंड प्रतिकसोबत Romantic अंदाज

'फक्त 5 दिवस बाकी' म्हणत Hruta Durguleचा बॉयफ्रेंड प्रतिकसोबत Romantic अंदाज

Actress Hruta Durgule

Actress Hruta Durgule

आघाडीची अभिनेत्री ऋता दुर्गुळे(Actress Hruta Durgule) हिने ती दिग्दर्शक प्रतिक शाह याच्यासोबत रिलेशनमध्ये असल्याचे नुकतेच जाहीर केले.

  • Published by:  Dhanshri Otari

मुंबई, 20 डिसेंबर: आघाडीची अभिनेत्री ऋता दुर्गुळे(Actress Hruta Durgule) हिने ती दिग्दर्शक प्रतिक शाह याच्यासोबत रिलेशनमध्ये असल्याचे नुकतेच जाहीर केले. ऋताने प्रतिक सोबत रिलेशनमध्ये असल्याचे जाहीर केल्यानंतर ती अनेकदा दोघांचे रोमँटिक अंदाजातील फोटो शेअर करत असते. दरम्यान, ऋताने बॉयफ्रेंड प्रतिकसोबत एक रोमँटिक व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

ऋताने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती बॉयफ्रेंड प्रतिकसोबत दिसत आहे. तिने या व्हिडीओला स्टार अभिनेता आर माधवनचा हिट चित्रपट 'रेहना है तेरे दिल मे' चित्रपटातील रोमँटिक गाणेदेखील जोडले आहे. दोघेही एकमेकांत अकंठ बुडाले असल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Hruta (@hruta12)

दोघांचा हा व्हिडीओ चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. तिच्या या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. तिने हा व्हिडीओ शेअर करताना गोड कॅप्शनदेखील दिली आहे. ' माझा अधिकृत खरा आणि जीवनाचा रील जोडीदार सापडला ,5 दिवस बाकी आहेत' असे तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

२५ डिसेंबर रोजी ऋता आणि प्रतिक साखरपुडा करणार आहेत. याचे सूतोवाच खुद्द ऋतानेचे सोशल मीडियावर पोस्ट करून दिली आहे. त्यामुळे ऋताच्या चाहत्यांचे लक्ष आता तिच्या साखरपुड्याकडे लागले आहे.

अभिनेत्री हृता दुर्गुळे (Actress Hruta Durgule) ही अभिनेत्री 'फुलपाखरू' या मराठी मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात पोहोचली ती सतत सोशल मीडियावर एक्टिव असते. अभिनेत्री हृता सध्या टीव्ही दिग्दर्शक प्रतिक शाहला (Hruta Durgule lover) डेट करत असून तिने आपले नाते सोशल मीडियावर व्यक्त केले असून आपल्या प्रेमाची कबुली दिली.

View this post on Instagram

A post shared by Hruta (@hruta12)

ऋताच्या कामाबद्दल सांगायचे तर छोट्या पडद्यावरील ती अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या ती 'मन उडू उडू झाले' या मालिकेमध्ये दीपू ची भूमिका साकारत आहे. त्याचप्रमाणे ऋता दादा एक गुड न्यूज आहे, या नाटकातही महत्त्वाची भूमिका साकारत आहे. तिच्या या नाटकालाही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. तर प्रतिक शाह हा देखील सिनेमा आणि टीव्ही विश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. त्याने आतापर्यंत तेरी मेरी एक जिंदरी, बहु बेगम, कुछ रंग प्या के ऐसे भी, मनमोहिनी अशा अनेक मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. प्रतिकची आई मुग्धा शाह ही देखील मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

First published:

Tags: Entertainment, Marathi entertainment