Elec-widget

#TheAccidentalPrimeMinister : 'और कितना बदनाम करेगी पार्टी, आप कुछ बोलते क्यू नही'

#TheAccidentalPrimeMinister : 'और कितना बदनाम करेगी पार्टी, आप कुछ बोलते क्यू नही'

भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. 2004 ते 2014 या काळात देशासाठी केलेल्या राजकीय आणि आर्थिक कामाचं आढावा सिनेमात पाहायला मिळणार आहे.

  • Share this:

मुबई, 27 डिसेंबर : मनमोहन सिंग यांच्या राजकीय जीवनावर आधारीत ‘दि अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच आहे. सिनेमात मनमोहन यांची भूमिका अनुपन खेर साकारत आहेत.


माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 2004 ते 2014 या काळात देशासाठी केलेल्या राजकीय आणि आर्थिक कामाचं दर्शन सिनेमात आहे. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना आलेल्या सर्व अडचणी आणि देशासाठी करावं लागलेलं सामना या सिनेमात पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन विजय गुट्टे यांनी केलं आहे. येत्या 11 जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


सिनेमातील इतर पात्रही दिग्दर्शकांनी वास्तविक उतरवण्याचा प्रयत्न केला आहे. सिनेमात सुझेन बेरनर्टने सोनिया गांधी यांची भूमिका स्विकारली आहे. तर अहाना कुम्राने प्रियांका गांधींची भूमिका साकारली आहे. चित्रपटात राहुल गांधींच कास्टिंग काही योग्य जमले नाही आहे. अर्जुन माथूनने राहुल गांधींची भूमिका साकारली आहे.

Loading...


चित्रपटात अक्षय खन्नाही प्रमुख भूमिकेत दिसत आहे. अक्षयने संजय बारू नावाची व्यक्तीरेखा स्वीकारली आहे. ज्यात तो राजकारण्यांवर टीका करताना दिसत आहे.
 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 27, 2018 04:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...