मुंबई, 31 मार्च : एकेकाळ बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री मनीषा कोईराला सर्वांनाच माहिती आहे. मनीषा कोईरालानं बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांबरोबर काम केलं. प्रोफेशन आयुष्यात सक्सेस होत असताना अभिनेत्रीनं वैयक्तिक आयुष्यात अनेक संकटांचा सामना केला. मनीषानं कॅन्सर सारख्या आजाराचा सामना करून पुन्हा स्वत:ला उभं केलं. पण तुम्हाला माहिती आहे का एके दिवशी मनीषा कोईरालाचा मृत्यू झाला असल्याची जाहिरात पेपरमध्ये छापून आली होत्या. या बातमीनं प्रेक्षक, बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये एकच खळबळ उडाली होती. स्वत: मनीषाला देखील या बातमीनं मोठा धक्का बसला होता. काय होत हे प्रकरण आज त्याविषयी या स्टोरीतून जाणून घेऊया.
21 जुलै 1995मध्ये हिंदी आणि तेलुगू भाषेत आलेला 'क्रिमिनल' हा सिनेमा रिलीज धाला. एक्शन थ्रीलर असलेल्या या सिनेमात अभिनेता नागार्जुन, राम्या कृष्णन आणि मनीषा कोईराला प्रमुख भूमिकेत होते. महेश भट्ट यांनी सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं होतं. 1993मध्ये आलेल्या अमेरिकन 'दि फ्यूजिटिव' सिनेमावर इन्स्पायर होऊन हा सिनेमा तयार करण्यात आला होता.
हेही वाचा - 29 वर्षात आमिर खाननं का नाही केलं सलमानबरोबर काम? इतके वर्ष लांब राहण्यामागे हैराण करणारं कारण
महेश भट्टचे सगळे सिनेमे त्याकाळी हटके असायचे. क्रिमिनल या सिनेमाची रिलीज डेट जवळ येऊ लागली होती आणि एक दिवस अचानक 'मनीषा कोईराला इज डेथ' अशी हेड लाइन असलेली जाहिरात पेपरमध्ये छापून आली. या बातमीनं संपूर्ण इंडस्ट्री हादरली होती. मनीषाला देखील ही बातमी वाचून झटका बसला. सकाळी उठल्या उठल्या आपल्याच निधनाची बातमी वाचून तिला देखील काय करावं आणि काय नाही हे सुचत नव्हतं.
तिनं ही बातमी आणि त्याचं एक पोस्टर पाहिलं आणि त्वरित महेश भट्टला फोन केला. तेव्हा महेश भट्टनं हे सगळं सिनेमाच्या प्रमोशनसाठी करतोय असं मनीषाला सांगितला. महेश भट्टच्या या वाक्यानंतर मनीषाच्या जीवात जीव आला. पण तिला सिनेमाचं प्रमोशन करायचा हा फंडा अजिबात आवडला नव्हता.
महेश भट्ट त्यांचा प्रत्येक सिनेमा वेगळ्या प्रकारे हातळत होते. जेव्हा सिनेमाच्या प्रमोशनची वेळ आली तेव्हा त्यांना काय करून सुचत नव्हतं. त्यांना काही करून जास्तीत जास्त प्रेक्षकांना सिनेमा पाहण्यासाठी थिएटरमध्ये घेऊन यायचं आहे. त्यांच्या डोक्यात मनीषाच्या डेथचे पोस्टर छापूया अशी आयडिया आली. कारण क्रिमिनल सिनेमात मनीषा कोईरालाचा मृत्यू दाखवण्यात आला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News