कंगनाच्या 'मणिकर्णिका'ला अजून एक झटका

कंगनाच्या 'मणिकर्णिका'ला अजून एक झटका

कंगना राणावतच्या मणिकर्णिका या सिनेमापुढील अडचणी काही संपता संपत नाहीयेत. कारण सिनेमाच्या टीममधून अजून एका अभिनेत्रीने काढता पाय घेतलाय.

  • Share this:

मुंबई, 01 आॅक्टोबर : कंगना राणावतच्या आजूबाजूला कधी वाद नसतील, तरच नवल म्हणायला हवं. कंगना राणावतचा मणिकर्णिकाची बरीच चर्चा सुरू आहे. कधी त्यात कंगनाचा हटवादीपणा समोर येतो, तर कधी सोनू सूदनं सिनेमा सोडल्याची बातमी येते. त्यामुळे रिलीज डेटला सिनेमा रिलीज होणार की नाही, हा प्रश्न समोर येतो.

कंगना राणावतच्या मणिकर्णिका या सिनेमापुढील अडचणी काही संपता संपत नाहीयेत. कारण सिनेमाच्या टीममधून अजून एका अभिनेत्रीने काढता पाय घेतलाय. या सिनेमात सदाशिवरावांची भूमिका करणाऱ्या सोनू सूदने हा सिनेमा सोडल्यानंतर त्याच्या पत्नीची भूमिका करणाऱ्या स्वाती सेमवालनेही हा सिनेमा सोडलाय.

याबाबत गेल्या काही दिवसांपासून डोक्यात विचार सुरू असला तरीही आता आपण निर्णयाप्रत आलो असल्याचं तिने सांगितलंय. सोनूने हा सिनेमा सोडल्यानंतर त्याच्या पत्नीच्या भूमिकेलाही फारसा अर्थ उरला नसल्याने आपण हा सिनेमा सोडत असल्याचं तिने जाहीर केलंय.

या सिनेमात एक खास गाणं अॅड केलं जाणार आहे. कंगना राणावत म्हणजेच झाशीच्या राणीवर ते गाणं चित्रित केलं जाणार आहे. त्यासाठी सरोज खान टीममध्ये आलीय. कंगना आणि तिचा सिनेमातला नवरा जिशू सेनगुप्तावर हे गाणं शूट केलं जाणार आहे. 18 सप्टेंबरला कर्जतला नितीन चंद्रकांत देसाईंच्या स्टुडिओत ते शूट होईल. कंगना त्याची खास प्रॅक्टिस करतेय.

कंगनाचा मणिकर्णिका हा चित्रपट २६ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. कंगनाचा मणिकर्णिका हा झांसीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारीत आहे. मुख्य भूमिकेत कंगना आहे.

सोनू सूदनं मणिकर्णिका सोडला. एका मुलाखतीत सोनूने मणिकर्णिका चित्रपट सोडल्याचं कारण सांगितलं. यावेळी तो म्हणाला की, मणिकर्णिकाचे काही सीन्स परत रिशूट करण्याचा निर्णय चित्रपटाच्या दिग्दर्शक क्रिशने घेतला आहे. पण हा चित्रपट घेण्याआधीच मी रोहित शेट्टीचा ‘सिंबा’ चित्रपट स्वीकारला होता आणि त्यानुसार दोन्ही चित्रपटांना डेट्स दिल्या होत्या. आता या चित्रपटाच्या रिशूटसाठी माझ्याकडे वेळ नाही.

कृष्णा कपूरचा लाडका होता नातू रणबीर, दोघांमध्ये होतं अनोखं शेअरिंग

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 1, 2018 12:18 PM IST

ताज्या बातम्या