मणिकर्णिका सिनेमाचं प्रोमोशन जोरात, महिला सुरक्षेबाबत कंगनाने सोडलं मौन

अभिनेत्री कंगना रनौत सध्या मणिकर्णिका सिनेमाच्या प्रोमोशनमध्ये व्यग्र आहे. एका मुलाखतीमध्ये कंगनाने महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून वक्तव्य केलं आहे.

  • Share this:

बॉलिवूड क्वीन कंगना रनौत सध्या मणिकर्णिका सिनेमाचं प्रमोशन करण्याची एकही संधी सोडत नाही. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान कंगना दररोज एक नवा खुलासा करत आहे. नुकताच तिने मोहनजोदडो चित्रपटावरून हृतिक रोशनवर टीका केली होती.

आता कंगनाने #MeToo प्रकरणावर वक्तव्य केलं आहे. प्रत्येक महिलेला सुरक्षेची जबाबदारी स्वत: घेतली पाहिजे आणि लहान मुलींनासुद्धा याबाबत जागृक केलं पाहिजे. लैंगिक छळाबाबत याआधीदेखील काही नावं समोर आली होती पण त्यांच्या विरोधात कोणतीही कार्यवाही केली गेली नाही. पण आता ज्या पद्धतीनं कार्यवाही केली जात आहे त्यामुळे लोक महिलांची छेड काढण्याआधी एकदा तरी नक्कीच विचार करतील. असं कंगनाने DNA ला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी कंगनाने राणी मुखर्जीच्या #MeToo प्रकरणावर वक्तव्य केलं होतं त्यावेळी सोशल मीडियावर तिच्याविषयी टिका करण्यात आली होती. कंगनाने सांगितलं की, 'मला वाईट वाटत जेव्हा महिलांना अशा विषयांवरून ट्रोल केलं जातं. आपले विचार मांडण्याचा अधिकार प्रत्येक महिलेला आहे. मग तरीही लोक असे का वागतात'

कंगनाचा मणिकर्णिका सिनेमा येत्या 25 जानेवारीला प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. सिनेमा कंगना आणि कृष यांनी एकत्र मिळून दिग्दर्शित केला आहे. मणिकर्णिका सिनेमात ती राणी लक्ष्मीबाई यांची व्यक्तीरेखा साकारणार असून विशेष म्हणजे दिग्दर्शन म्हणून कंगनाची हा पहिला चित्रपट आहे.

मणिकर्णिका सिनेमाचा बजेट 225 कोटी असून चित्रपटाचं लेखन कवी विजयेंद्रने यांनी केलं आहे. या सिनेमात कंगना तलवार पासून ते घोडेसुद्धा चालवताना दिसणार आहे. सिनेमासाठी कंगनाने एकूण 14 कोटी रुपये घेतले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 22, 2019 05:24 PM IST

ताज्या बातम्या