मुंबई, 07 डिसेंबर: वरुण धवन (Varun Dhawan) आणि कियारा आडवाणी (Kiara Advani) च्या फिल्म 'जुग-जुग जियो' (Jug Jug Jiyo) च्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीच बातमी आली होती की, वरुण धवन नीतू कपूर यांना कोरोना झाला आहे. तसंच फिल्मचे दिग्दर्शक राज मेहतादेखील पॉझिटिव्ह आढळले होते. त्यामुळे सिनेमाचं शूटिंग थांबलं होतं. आता अशी माहिती समोर येत आहे की, अभिनेता मनीष पॉललाही (Manish Paul) कोरोना झाला आहे.
कोरोनाचा रिपोर्ट हाती आल्यानंतर मनीष पॉल शूटिंगचं लोकेशन सोडून मुंबईत आला आहे. त्याने मुंबईतील घरी स्वत:ला क्वारंटाईन केलं आहे. सध्यातरी मनीष पॉल किंवाच्या त्याच्या टीमकडून याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. तर दुसरीकडे तनाज इराणी या छोट्या पडद्यावरील अभिनेत्रीला कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं आहे. इंन्टाग्रामवरुन तिने आपल्या तब्येतीची माहिती दिली.
तनाजने पोस्टमध्ये लिहीलं आहे की, माझे रिपोर्ट् कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. मी देवाकडे प्रार्थना करेन की माझ्यासोबतच्या इतर कोणालाही कोरोनाची लागण झाली नसूदे. #covid_19 #positive #fever #weakness #dull #headache #praying #familyfirst. असे हॅशटॅगही तिने वापरले आहेत. कोरोना झाल्यावरही ती सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करत आहे.
View this post on Instagram
बॉलिवूड सध्या कोरोनाच्या विळख्यात सापडलं आहे असंच म्हणावं लागेल कारण, एकाच दिवशी 2 कलाकारांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत तर आजच हिंदी टीव्ही मालिकांमध्ये काम करणाऱ्या प्रसिद्धी अभिनेत्रीचं निधन झालं आहे. 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री दिव्या भटनागर यांचं निधन झालं आहे.