अर्जुन कपूर मलायका अरोरासोबत लग्न करतोय? काय आहे त्याच्या हातातील या मंगळसूत्राचं सिक्रेट

अर्जुन कपूर मलायका अरोरासोबत लग्न करतोय? काय आहे त्याच्या हातातील या मंगळसूत्राचं सिक्रेट

हातात मंगळसूत्र घेतलेल्या अर्जुन कपूरच्या (Arjun kapoor) या फोटोमुळे चर्चांना उधाण आलं आहे.

  • Share this:

मुंबई, 01 एप्रिल : अभिनेता अर्जुन कपूर (Arjun kapoor) अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika arora) सोबत तो रिलेशनमध्ये आहे. त्यांचे एकत्रित फोटो आणि व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असतात. बॉलिवूडमधील हे कपल (Bollywood couple) कायम चर्चेत असतं. ते दोघं लग्न करणार असल्याच्या अफवाही अनेकदा उठल्या आहेत. दरम्यान आताही अर्जुन कपूरच्या एका फोटोमुळे पुन्हा त्यांच्या लग्नाची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे आणि याचं कारण म्हणजे अर्जुनने आपल्या सोशल मीडियावर शेअर केलेला एक फोटा.

अर्जुन कपूरने आपल्या इन्टाग्रामवर नुकताच एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये त्याच्या हातात मंगळसूत्र दिसतं आहे. हा फोटो पाहून हे मंगळसूत्र मलायकासाठी तर नाही ना? अर्जुन-मलायका लग्न तर करत नाहीत ना? असाच प्रश्न पडेल. पण या मंगळसूत्रासोबत आपलं पर्सनल कनेक्शन आहे, असं सांगत खुद्द अर्जुननेच या मंगळसूत्राचं सिक्रेटही या पोस्टमध्ये सांगितलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

अर्जुन म्हणाला,  की अँड का या चित्रपटातील आठवणीत राहिलेला हा फोटो. चित्रपटाचा सेट आणि चित्रपटातील की दोघांनाही मिस करतो आहे. मी माझ्या आईच्या इच्छेखातर हा चित्रपट स्वीकारला होता त्यामुळे ती माझी खासगी बाब आहे आणि आता बेबो आणि बाल्कि सरांसोबत काम केल्यानंतर तर ती अधिक खासगी झाली आहे. मला वाटतं या चित्रपटाचा सिक्वल तयार करायला हवा. काय म्हणतेस करीना कपूर?"

अर्जुन आणि करिना कपूर खान यांच्या अभिनयाने सजलेला की अँड का या चित्रपटाला पाच वर्षं पूर्ण झाल्यामुळे अर्जुनने हा फोटो शेअर केला आहे. अर्जुनची आई दिवंगत मोना शौरी कपूर यांची आठवण आल्यामुळे त्याने की अँड का मधला फोटो शेअर केला आहे, असं अर्जुनने सांगितलं.

हे वाचा - Dia Mirza Pregnant : लग्नानंतर दीड महिन्यांतच दिया मिर्झाने दिली GOOD NEWS

अर्जुनने या आधीही हा चित्रपट त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता असं सांगितलं होतं. मला माझ्या आईसारखं व्हायचंय एवढं एका ओळीचं स्क्रिप्ट ऐकूनच त्याने या चित्रपटासाठी होकार दिल्याचंही त्यांने सांगितलं होतं.

भारतीय संस्कृतीमध्ये महिला घरातील कामं करतात आणि पुरुष नोकरी करून पैसे कमवून आणतात अशी धारणा आहे. या धारणेला छेद देत बाई नोकरी करते आणि पुरूष घर सांभाळतो या विषयावर दिग्दर्शक आर. बाल्की यांनी हा चित्रपट काढला होता. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट यशस्वी ठरला होता. या चित्रपटाचा सिक्वेल लवकरच येईल अशी अपेक्षा तिसऱ्या चहात्यानी व्यक्त केली आहे.

हे वाचा - All The Rajni Fans… पाहा रजनीकांत यांचे भन्नाट मिम्स

दिबाकर बॅनर्जीच्या संदीप और पिंकी फरार या गेल्या महिन्यात आलेल्या चित्रपटात अर्जुन आणि परिणिती चोप्रा यांनी भूमिका केल्या होत्या. कोविड19 महासाथीमुळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नाही. पवन कृपलानीची हॉरर कॉमेडी फिल्म भूत पोलीस, काशवी नायरची सरदार का ग्रँडसन आणि मोहित सूरीचा एक व्हिलन रिटर्न्स हे चित्रपट सध्या अर्जुन करतो आहे.

First published: April 1, 2021, 10:53 PM IST

ताज्या बातम्या