भिडे सर टप्पूच्या आठवणीनं झाले व्याकूळ; म्हणाले, ‘तारक मेहतामध्ये तू पुन्हा ये…’

नव्या टप्पू पेक्षा जुनाच टप्पू बरा होता? तारक मेहतामधील कलाकारांना येतेय भव्या गांधीची आठवण

नव्या टप्पू पेक्षा जुनाच टप्पू बरा होता? तारक मेहतामधील कलाकारांना येतेय भव्या गांधीची आठवण

  • Share this:
    मुंबई 23 जून: तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय विनोदी मालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. गेली 13 वर्ष ही मालिका सातत्यानं प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. यावरुनच या मालिकेच्या लोकप्रियतेचा अंदाज आपल्याला येतो. या मालिकेनं मिळवलेल्या यशात अभिनेता भव्य गांधी (Bhavya Gandhi) याचा सिंहाचा वाटा आहे. त्यानं तारक मेहतामध्ये साकारलेली टिपेंद्र जेठालाल गडा उर्फ टप्पू ही भूमिका तुफान गाजली. भिडे सरांसोबत (Bhide sir) त्याचे होणारे मतभेद हे चाहत्यांसाठी हास्यमेजवाणीचे क्षण असायचे. परंतु हेच क्षण आठवून आता स्वत: भिडे गुरुजी देखील भावूक झाले. त्यांना त्यांच्या आवडत्या टप्पूची दररोज आठवण येते. शाहरुख खाननं का करत नाही अक्षय कुमारसोबत काम? कारण ऐकून तुमचंही डोकं चक्रावेल भव्यानं नुकताच आपला 23 वा वाढदिवस साजरा केला. या निमित्तानं त्यानं मालिकेत भिडे सरांची भूमिका साकारणाऱ्या मंदार चांदवडेकरसोबत (Mandar Chandwadkar) इन्स्टाग्रामवर गप्पा मारल्या. या गप्पा मारत असताना मंदार भावूक झाला. त्याला सेटवर पोहोचताच प्रत्येक क्षणी भव्याची आठवण येते हे त्यानं मान्य केलं. तो म्हणाला, “तु माझ्यासमोर लहानाचा मोठा झाला आहेस. जवळपास 10 वर्ष आपण सेटवर एकत्र असायचो. त्यामुळं आता तू गेल्यानंतर तुझी खूप आठवण येते. अर्थात तू खुप विचार करुनच निर्णय घेतलास. आता तू मोठा हिरो झाला आहेस. मालिकेत का होईन मी तुझा शिक्षक होतो. अन् माझा विद्यार्थी इतका यशस्वी होत असताना पाहून खूप आनंद होतोय.” तारक मेहतामध्ये अखेर दया बेनची वापसी; पण दिशाऐवजी असेल ‘ही’ अभिनेत्री तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेमुळं भव्य गांधी जणू सुपरस्टारच झाला होता. घराघरात त्याचा चाहता वर्ग निर्माण झाला होता. परंतु याच दरम्यान त्याला गुजराती चित्रपटांच्या ऑफर देखील मिळू लागल्या होत्या. त्यामुळं भव्यनं स्वत:ला आणखी मोठा प्लॅटफॉर्मवर सादर करण्यासाठी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. अर्थात निर्मात्यांनी केलेल्या दाव्यानुसार त्यानं मालिका सोडू नये म्हणून प्रयत्न करण्यात आले होते. परंतु टप्पूला एकच भूमिका अनेक वर्ष साकारण्याचा कंटाळा आला होता. अन् त्यानं मालिका सोडून दिली. मालिका सोडल्यानंतर भव्यनं एका गुजराती चित्रपटात काम केलं.
    Published by:Mandar Gurav
    First published: