मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /अभिनेत्रीचा गंभीर खुलासा, रिलेशनशीपमध्ये असताना प्रेग्नंट राहिल्यावर डायरेक्टरने दिलं सोडून

अभिनेत्रीचा गंभीर खुलासा, रिलेशनशीपमध्ये असताना प्रेग्नंट राहिल्यावर डायरेक्टरने दिलं सोडून

Mandana Karimi

Mandana Karimi

लॉक-अप (Lock Upp) शो ची स्पर्धक अभिनेत्री मंदाना करिमीने (Mandana Karimi) धक्कादायक खुलासा केला आहे. मंदानानं एका प्रसिध्द दिग्दर्शकाशी असलेल्या संबंधांबाबत या शोमध्ये (Mandana Karimi relation with director) सांगितलं आहे.

  नवी दिल्ली, 13 एप्रिल: सतत चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) सध्या एक ओटीटी रिॲलिटी शो होस्ट करत आहे. लॉक-अप (Lock Upp) असं या शोचं नाव आहे. हा शोसुद्धा भरपूर लोकप्रिय आहे. यामध्ये सहभागी स्पर्धकांच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडित एक प्रश्न विचारला जातो. त्याच्या उत्तरांमधून अनेकदा प्रेक्षकांना आश्चर्याचे धक्के बसत आहेत. कारण सेलिब्रिटींच्या आयुष्यातील माहिती नसलेल्या अनेक गोष्टी यामधून पुढे येतात. यातच अभिनेत्री मंदाना करिमीच्या (Mandana Karimi) आयुष्यातीलही एक धक्कादायक बाब समोर आली आहे.

  मंदानानं एका प्रसिध्द दिग्दर्शकाशी असलेल्या संबंधांबाबत या शोमध्ये (Mandana Karimi relation with director) सांगितलं आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक काळी गुपितं दडलेली असतात हेच मंदानाच्या गोष्टीवरून सिद्ध झालं. मंदानाचं दु:ख ऐकून कंगनाच्या डोळ्यांमध्येही अश्रू आले.

  या शोमध्ये कंगना राणावतनं एखादं सिक्रेट शेअर करण्यासाठी सांगितलं तेव्हा मंदानानं सगळ्यांत आधी बझर दाबला, असं प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे. “ज्यावेळेस मी माझ्या वेगळं होण्याच्या समस्येला सामोरी जात होते (गौरव गुप्तासोबतच्या घटस्फोटाबाबत मंदाना बोलत होती.), तेव्हा माझी एक सिक्रेट रिलेशनशीप होती. एका अत्यंत प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शकासोबत माझे शारिरीक संबंध होते. हा दिग्दर्शक नेहमी महिलांच्या हक्कांबाबत बोलत असतो. तो अनेकांसाठी आदर्शही आहे. आम्ही मूल होऊ देण्याचा निर्णयही घेतला होता, मात्र जेव्हा प्रत्यक्षात मी प्रेग्नंट राहिले तेव्हा मात्र त्यानं पूर्णपणे माघार घेतली आणि आमच्यातलं सगळं काही संपवलं,” असं मंदानानं सांगितलं.

  सोशल मीडियावर या शोची एक क्लिप व्हायरल होत आहे. यामध्ये मंदाना आपलं दु:ख व्यक्त करताना (Mandana Karimi Relation)दिसत आहे. ‘ मी प्रसिद्ध दिग्दर्शकाबरोबर सेटल होण्याचा निर्णय घेतला होता, आम्ही मूल होऊ देण्याचा निर्णय घेतला होता. पण नंतर मात्र ती व्यक्ती घाबरली आणि मागे हटली. त्यामुळे मला गर्भपात (Mandana Karimi Abortion) करून घ्यावा लागला,’ हे सांगताना मंदानाला अश्रू आवरले नाहीत. ती अक्षरश: हुंदके देऊन रडत होती. मंदानाची ही कहाणी ऐकून तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्याच डोळ्यांत पाणी आलं होतं.

  लॉक-अप हा शो एमएक्स प्लेअर आणि अल्ट बालाजी (Alt Balaji) वर स्ट्रीम केला जात आहे. मुनव्वर फारुकी, अंजली अरोरा, पायल रोहतगी, विनीत, जिशान खान आणि करणवीर बोहरा या शोमध्ये सहभागी झाले आहेत. या रविवारी विनित कक्कड शोमधून बाहेर पडला आहे.

  मंदाना करिमीचं (Mandana Karimi Wedding) बिझनेसमन गौरव गुप्ताशी (Gaurav Gupta) 2017 मध्ये धूमधडाक्यात लग्न झालं होतं. लग्नापूर्वी दोन वर्षे हे दोघंजण एकमेकांना डेट करत होते. मात्र लग्नानंतर काही महिन्यांतच हे दोघे एकमेकांपासून वेगळे झाले. घराच्या चार भिंतीआड गौरव आपल्यावर अत्याचार करत असल्याचं सांगत मंदानानं त्याच्यावर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. त्याच्या घरच्यांवरही तिनं गंभीर आरोप केले होते. गेल्यावर्षीच गौरव आणि मंदानाचा घटस्फोट झाला.आता या शो मधल्या व्हायरल क्लिपमुळे मंदाना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

  First published:

  Tags: Bollywood actress, Entertainment, Kangana ranaut, Pregnancy, Tv shows