अंडरवर्ल्ड डॅान दाऊदची प्रेमकहाणी आता रुपेरी पडद्यावर

'दाऊद' हा चित्रपट हिंदी बरोबरच मराठी, तमिळ, तेलगू या भाषेतही रिलिज होणार आहे.

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: May 3, 2017 03:24 PM IST

अंडरवर्ल्ड डॅान दाऊदची प्रेमकहाणी आता रुपेरी पडद्यावर

मोहम्मद तारिक, मुंबई

03 मे : यावर्षी अंडरवल्ड डॅान दाऊद इब्राहिमवर आणखी एक चित्रपट बनतोय ज्याचं नाव आहे दाऊद. या चित्रपटात दाऊदच्या लहानपणापासून ते तारूण्यापर्यंतचा प्रवास असेल. एक लहान मुलगा डॅान कसा बनला याची ही कहाणी दाखवण्यात येणाराय. पण या चित्रपटाचं मुख्य आकर्षण आहे ते म्हणजे दाऊद-मंदाकिनी याचं प्रेमकहाणी.

अंडरवल्ड डॅान दाऊदची नेहमीच बॅालिवूडला भुरळ पडते. चित्रपटांमध्ये दाऊदचा कधी थेट तर कधी अप्रत्यक्षपणे उल्लेख नेहमीच होत असतो. मात्र यावेळी थेट दाऊद कसा डॅान बनला याची कहाणी 'दाऊद' या चित्रपटात सांगितलीय.

मंदाकिनी आणि दाऊद यांच्या प्रेमप्रकरणाची नेहमीच चर्चा होते. मात्र या चित्रपटात थेट त्यांच्या प्रेमकहाणीवर फोकस ठेवलाय.

'दाऊद' हा चित्रपट हिंदी बरोबरच मराठी, तमिळ, तेलगू या भाषेतही रिलिज  होणार आहे. यावर्षीच्या ईद दरम्यान सलमान खानचा ट्यूबलाईट हाही चित्रपट रिलिज होतोय. त्याला आता दाऊद या चित्रपटाची टक्कर असणाराय. त्यामुळे दाऊद बॅाक्स आॅफीसवर किती कमाल करतोय ते पाहावं लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 3, 2017 11:38 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...