मुंबई, 01 डिसेंबर : रिक्षावाला फेम अभिनेत्री मानसी नाईक मागच्या काही काळापासून चांगलीच चर्चेत आली आहे. मानसी आणि तिचा पती प्रदीप खरेरा यांच्यात काही आलेबेल नसून दोघे घटस्फोट घेत आहेत. मानसी नाईकच्या या खुलास्यानंतर तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. मानसी आणि प्रदीप यांनी मागच्या वर्षी लग्न केलं. मात्र अवघ्या दीड वर्षात दोघांमधील नात्याला पूर्ण विराम देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. दोघांना सोशल मीडियावर पसंती मिळाली होती. दोघांचे रिल्स व्हिडीओ सातत्यानं व्हायरल होत होते. आता घटस्फोटांनंतर दोघांच्या पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहेत.
घटस्फोटांच्या चर्चांनंतर मानसी नाईकच्या पोस्टची चाहत्यांमध्ये चर्चा होत आहे. आता यानंतर मानसीने एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये ती चक्क रडताना दिसतेय. व्हिडिओत मानसी म्हणतेय कि, ''यहाँ से बहोत दूर....गलत और सही के पार एक मैदान है... वहा मिलूंगी तुझे'' असं म्हणत मानसीच्या डोळ्यात अश्रू तरळले. तिच्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर कमेंट करत चाहते तिला धीर देत आहेत.
हेही वाचा - 'तू तेव्हा तशी' मालिकेतील अभिनेता प्रथमच दिसणार ऐतिहासिक भूमिकेत; चित्रपटाचे पोस्टर रिलीज
मानसी नाईकने नवरा प्रदीपबरोबर घटस्फोट घेत असल्याचं नुकतंच तिनं सांगितलं.आता तिने एका मुलाखतीत पती प्रदीप खरेरापासून घटस्फोट घेण्याचं खरं कारण सांगितलं असून त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा गेल्या वर्षीच म्हणजे २०२१मध्ये जानेवारी महिन्यात लग्नबंधनात अडकले होते. त्यापूर्वीही ते दोघं लिव्ह-इनमध्ये राहत होते. आता लग्नानंतर वर्षभरातच दोघांनी घटस्फोट घेतल्यानं अनेक चर्चा होत आहेत.
View this post on Instagram
प्रदीपवर गंभीर आरोप करत मानसी म्हणाली की, काही लोक फक्त प्रसिद्धी आणि पैसा मिळवण्यासाठी एखाद्या व्यक्तीशी नातं जोडतात. पैसे मिळतात, प्रसिद्धी मिळतेय तोपर्यंत ते चांगले असतात, त्यांच्याकडून मिळेल तेवढं घेतातात. असंच काही तरी माझ्यासोबत झालं. तसंच ती म्हणाली, सध्या यावर जास्त बोलता येणार नाही, पण बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या लवकरच सर्वांसमोर आणायच्या आहेत असंही मानसीनं स्पष्ट केलंय.
मानसी प्रदिपविषयी बोलताना पुढे म्हणाली कि, घटस्फोटोंच्या चर्चा सुरू झाल्यानंतर अनेक जण मला विचारत आहेत, की, लग्नकरण्यापूर्वी तुला माहीत नव्हतं का तो कसा आहे? तुला कळलं नाही का केव्हा. त्यांना मी हेच सांगेन की, लग्नापूर्वी आम्ही लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होतो. करोना लॉकडाऊनच्या काळात आम्ही एकत्रच होतो. तेव्हा सगळेच एकमेकांशी चांगले वागत होते, असं मानसी म्हणाली. आता मानसी या सगळ्यातून लवकरच बाहेर पदवी आणि पुन्हा जोमाने कमला लागावी अशी आशा चाहते करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.