Home /News /entertainment /

‘आज मेरे जमीन पर नहीं हैं कदम’; मानसी नाईकचा पतीसोबत रोमँटिक Video Viral

‘आज मेरे जमीन पर नहीं हैं कदम’; मानसी नाईकचा पतीसोबत रोमँटिक Video Viral

तिच्या या व्हिडीओवर काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी त्यांच्या जोडीचं कौतुक देखील केलं आहे.

  मुंबई 5 जुलै: आपल्या दिलखेचक अदांनी चाहत्यांना घायाळ करणारी मानसी नाईक (Manasi Naik) मराठी मनोरंजनसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. चित्रपटांसोबतच ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. ग्लॅमरस फोटोंद्वारे ती कायम चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. (Manasi Naik video viral) यावेळी देखील तिने असाच एक लक्षवेधी व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती आपल्या पतीसोबत बाईक राईडिंग करताना दिसत आहे. “वो कहाँ छुप रहे थे मैं हैरान थी, मेरी सदियों से उनसे ही पहचान थी, ऐसे क़िस्से ज़माने में होते हैं काम, आज मेरे ज़मीं पर नहीं हैं कदम,मिल गए मिल माये आज मेरे सनम, आज मेरे ज़मीं पर नहीं हैं कदम” अशी कॅप्शन देत तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओवर काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी त्यांच्या जोडीचं कौतुक देखील केलं आहे. सुबोधच्या पत्नीने शेयर केला थ्रोबॅक PHOTO; 15 वर्षांपूर्वी असं दिसायचं हे कपल
  झोपेतही रडायची विद्या बालन; सततच्या रिजेक्शनमुळे होती डिप्रेशनमध्ये मानसीचा पती  प्रदीप हा प्रोफेशनल बॉक्सर आहे. प्रदीप वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत आशिया गटातलं विजेतेपद मिळवलेलं आहे. तर मानसीच्या नृत्यकौशल्याची तरुणाईमध्ये तुफान क्रेझ आहे. बऱ्याचदा ती सोशल मीडियावर आपल्या डान्स आणि फॅशन स्टेटमेंटमुळे चर्चेत असते. मानसीने आतापर्यंत ‘हॅलो बोल’, ‘मराठी तारका’ यांसारख्या अनेक मराठी रिअॅलिटी डान्सिंग शोच्या माध्यमातून आपले नृत्यकौशल्य दाखवले आहे. याव्यतिरिक्त रुपेरी पडद्यावरही मानसीने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. मानसीचे ‘बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर या’ हे गाणे प्रचंड प्रसिद्ध झाले होते.
  Published by:Mandar Gurav
  First published:

  Tags: Entertainment, Marathi actress, Video viral

  पुढील बातम्या