VIDEO : सुबोध भावेला कोण म्हणतंय, 'जवळ घे ना'!

प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या अभिनेत्याला एका व्यक्तीने मात्र आपल्या तालावर नाचवलं. तिच्या तालावर सुबोध भावे नाचलाही.

News18 Lokmat | Updated On: Nov 3, 2018 09:51 AM IST

VIDEO : सुबोध भावेला कोण म्हणतंय, 'जवळ घे ना'!

मुंबई, 03 नोव्हेंबर : नाटक असो, मालिका असो वा सिनेमा. तीनही माध्यमांवर वर्चस्व गाजवणारा अभिनेता म्हणजे सुबोध भावे. सध्या सगळीकडे सुबोधचाच दबदबा पाहायला मिळतोय. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या अभिनेत्याला एका व्यक्तीने मात्र आपल्या तालावर नाचवलं. तिच्या तालावर सुबोध भावे नाचलाही. अगदी रोमँटिक सुरांवर. खरं तर आतापर्यंतच्या भूमिकांमध्ये सुबोधला नाचायची फार संधी नव्हती मिळाली.


मग सुबोधला नाचवणारी ही व्यक्ती आहे तरी कोण?  ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून आहे अभिनेत्री मानसी नाईक. ‘स्टार प्रवाह’वरील ‘दिन दिन दिवाळी’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुबोध-मानसीने पहिल्यांदाच गाण्यांवर एकत्र ठेका धरला. मराठी सिनेमाचा सुवर्णकाळ समजला जाणाऱ्या सदाबहार गाण्यांवर या दोघांनी परफॉर्म केलं.


मानसी जरी उत्तम नृत्यांगना असली तरी तिच्यामते सुबोधचा उत्साह थक्क करणारा आहे. ‘मी आणि सुबोध खूप चांगले मित्र असल्यामुळे डान्समध्येही तीच केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळेल असं मानसीने सांगितलं. सुबोधसोबत मी याआधी कधीच परफॉर्म केलं नव्हतं. त्यामुळे थोडी भीती होती. पण रिहर्सलदरम्यान सुबोधने माझी भीती पळवली आणि आम्ही धमाकेदार नृत्य सादर करू शकलो. या परफॉर्मन्सनंतर सुबोधच माझ्यापेक्षा उत्तम डान्सर आहे, हे मी ठोसपणे सांगू शकते, ' अशी भावना मानसीने व्यक्त केली.

Loading...


या दोघांच्या रिहर्सलचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झालाय. त्याला भरपूर लाईक्सही मिळतायत.
सुबोध आणि मानसीच्या या धमाकेदार नृत्यासोबतच सिद्धार्थ जाधव, भार्गवी चिरमुले, मृण्मयी देशपांडे, मानसी नाईक, पर्ण पेठे, मयुरेश पेम आणि स्टार प्रवाहवरील ‘छोटी मालकीण’ मालिकेतील रेवती आणि ‘ललित २०५’ मधील नील यांचा अनोखा अंदाज प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 3, 2018 09:51 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...