मुंबई, 1 डिसेंबर- झी मराठीवरील नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली मालिका 'मन झालं बाजिंद' (Man Zal Bajind) प्रेक्षकांची आवडती मालिका झाली आहे. या मालिकेवर आणि त्यातील व्यक्तिरेखांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. कृष्णा (Krishna) आणि राया (Raya) ही जोडी देखील प्रेक्षकांची अगदी आवडती जोडी बनली आहे. नुकतच या जोडीने पांडू सिनेमातील एका गाण्यावर जबरदस्त रील सादर केले आहे. सध्या हे रील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सध्या सर्वत्र धुमाकूळ घालत असलेल्या आणि सोशल मीडियावर लाखाहुन अधिक व्ह्यूव्ज मिळवलेल्यापांडू चित्रपटातील ‘बुरुम बुरुम’ या गाण्यावर कृष्णा (Krishna) आणि राया (Raya) डान्स करताना दिसत आहेत. त्यांचा हा जबरदस्त डान्स व्हिडीओ झी मराठीने इन्स्टावर शेअर केला आहे. चाहत्यांकडून याला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.
‘पांडू’ चित्रपटात एकूण पाच गाणी आहेत. यातील ‘दादा परत याना’ आणि ‘बुरुम बुरुम’ हे गाणं अवधूत गुप्ते यांनी लिहिलं असून त्यांना या गाण्यासाठी अनुक्रमे आदर्श शिंदे आणि वैशाली सामंत यांची साथ मिळाली आहे. याशिवाय सर्वांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या ‘जाणता राजा’ हे गीत समीर सामंत यांनी लिहिलं असून त्याला अबोली गिऱ्हे या नव्या गायिकेसोबत आदर्श शिंदेचा रांगडा आवाज लाभला आहे. ‘बॅडलक खराब हाय’ या गाण्याचे शब्द वैभव जोशी यांचे असून ते रामानंद उगळे यांनी गायलं आहे तर ‘केळेवाली’ हे गीत विजू माने यांनी लिहिलं असून ते अवधूत गुप्ते आणि संपदा माने यांनी गायलं आहे.
वाचा : 'एकदम भंगार विनोद'; 'हे तर काहीच नाय' म्हणणाऱ्या झीच्या नव्या शोची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
मागील दोन वर्षांपासून लॉकडाऊन आणि पॅंडेमिकच्या चक्रात अडकलेलं मनोरंजन क्षेत्र आता हळूहळू खुलं होत आहे. सिनेमगृहे, नाट्यगृहे उघडल्यामुळे विविध कलाकृती प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. काहीशा तणावाच्या या वातावरणात प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी आणि त्यांचा थोडासा ताण दूर करण्यासाठी झी स्टुडिओजची निर्मिती असलेला ‘पांडू’ हा निखळ विनोदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
View this post on Instagram
मराठी सिनेसृष्टीत विनोदी चित्रपटांची एक मोठी परंपरा आहे. दादा कोंडके यांचे चित्रपट असो की सचिन-अशोक सराफ- लक्ष्मीकांत बेर्डे यांचे चित्रपट, यातील विनोदाबरोबरच त्याचेही गाण्यांनी, संगीताने प्रेक्षकांची मने जिंकली. विनोद आणि संगीताची हीच परंपरा कायम राखण्याचं काम ‘पांडू’ही करणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.