ManVsWild: आज अ‍ॅडव्हेंचर करताना दिसतील पंतप्रधान मोदी, एकाचवेळी 180 देशांमध्ये प्रदर्शित होणार शो

ManVsWild: आज अ‍ॅडव्हेंचर करताना दिसतील पंतप्रधान मोदी, एकाचवेळी 180 देशांमध्ये प्रदर्शित होणार शो

या भागात पंतप्रधान मोदी यांचं एक वेगळं रूप पाहायला मिळेल, जे आतापर्यंत लोकांनी कधीच पाहीलं नसेल.

  • Share this:

मुंबई, 12 ऑगस्ट- मॅन वर्सेस वाइल्डमध्ये (Man Vs Wild) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पाहण्यासाठी आज प्रत्येकजणच उत्सुक असेल. आज रात्री 9 वाजता डिस्कवरी वाहिनीवर 'मॅन वर्सेस वाइल्ड' या कार्यक्रमात बेअर ग्रिल्स (Bear Grylls) यांच्यासोबत जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील जंगलात अविस्मरणीय क्षण अनुभवताना दिसतील. या भागाचं चित्रीकरण निसर्गरम्य हिमालयात फेब्रुवारी महिन्यातच पूर्ण झालं. या भागाच्या चित्रीकरणादरम्यान, मोदी यांनी जिम कॉर्बेट पार्कमध्ये होस्ट बेअर ग्रिल्ससोबत अनेक चित्तथरारक क्षण अनुभवत तिथल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबतही चर्चा केली. आज त्यांचा हा भाग 180 देशांमध्ये दाखवण्यात येणार आहे. याआधी या भागाचे दोन प्रोमो व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते.

एका वेगळ्या रुपात दिसतील पीएम मोदी-

मोदी यांच्यासोबत शूट केलेल्या या भागाबद्दल बोताना ग्रिल्स म्हणाला की, 'या भागात पंतप्रधान मोदी यांचं एक वेगळं रूप पाहायला मिळेल, जे आतापर्यंत लोकांनी कधीच पाहीलं नसेल. जोवर संकट येत नाही तोवर लोकांचा मुळ स्वभाव कळत नाही. हे पाहून आनंद वाटला की, पंतप्रधान मोदी यांच्यासारखे जागतिक दर्जाचे नेते कठीण प्रसंगातही शांत आणि स्थिर राहतात. याआधी मला अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांच्यासोबत अलास्कामध्ये एक भाग शूट करण्याची संधी मिळाली होती. ओबामा आणि मोदी दोघंही जागतिक नेते आहेत.'

या वाहिनीवर नरेंद्र मोदी यांना स्टंट करताना पाहू शकता-

मॅन वर्सेस वाइल्ड हा शो एकाचवेळी डिस्कवरी चॅनल, डिस्कवरी HD वर्ल्ड, अ‍ॅनिमल प्लॅनेट, डिस्कवरी सायन्स, अ‍ॅनीमल प्लॅनेट HD वर्ल्ड, TLC, TLC HD वर्ल्ड, जीत प्राइम, जीत प्राइम HD, डिस्कवरी टर्बो, डिस्कवरी किड्स, डी तमिळवर पाहता येऊ शकता. याशिवाय 180 देशांमध्येही हा शो एकाचवेळी पाहता येणार आहे.

या अभिनेत्रीवर होतोय कौटुंबिक हिंसाचार, मुलीला मारायचा नवरा

पुरग्रस्तांच्या मदतीला धावले रितेश- जेनेलिया देशमुख, केली 25 लाखांची मदत

मुशर्रफ यांच्या नातेवाईकांच्या मेहंदीत गायला हा भारतीय गायक, युझर्स म्हणाले....

VIDEO पूरपरिस्थितीत तारतम्य न बाळगणाऱ्या ट्रोलर्सना सई ताम्हणकरनं 'असं' खडसावलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 12, 2019 01:15 PM IST

ताज्या बातम्या