मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Man Vs Wild मध्ये अक्षय कुमार गोमूत्र नव्हे प्यायला हत्तीचं शेणाचा चहा

Man Vs Wild मध्ये अक्षय कुमार गोमूत्र नव्हे प्यायला हत्तीचं शेणाचा चहा

आपण नियमित आयुर्वेदिक कारणास्तव गोमूत्र सेवन करत असल्याचं वक्तव्य अक्षय कुमारने केलं आणि Cow Urine चे फायदे शोधण्यासाठी Google वर गर्दी झाली.

आपण नियमित आयुर्वेदिक कारणास्तव गोमूत्र सेवन करत असल्याचं वक्तव्य अक्षय कुमारने केलं आणि Cow Urine चे फायदे शोधण्यासाठी Google वर गर्दी झाली.

आपण नियमित आयुर्वेदिक कारणास्तव गोमूत्र सेवन करत असल्याचं वक्तव्य अक्षय कुमारने केलं आणि Cow Urine चे फायदे शोधण्यासाठी Google वर गर्दी झाली.

मुंबई, 14 सप्टेंबर : विविध भूमिका व आपल्या धाडसी  निर्णयांनी नेहमीच चर्चेत राहणारा अक्षय कुमार (Akshay Kumar cow urine secret) नुकताच बिअर ग्रिल्सच्या (bear grylls) मॅन वर्सेस वाईल्ड (Man vs wild) या (discovery plus) कार्यक्रमात झळकला होता़. आता पुन्हा एकदा तो वेगळ्याच विषयामुळे चर्चेत आला आहे. अक्षय

कुमारने Man Vs Wild या कार्यक्रमात बेअर ग्रिल्सबरोबर हत्तीचं शेण पिळून त्याचा चहा केला आणि तो चक्क प्यायला. आपण आयुर्वेदिक कारणास्तव नियमित गोमूत्र सेवन करत असल्याचं अक्षयने नंतर सांगितलं. त्यामुळे आपल्याला हे विशेष आव्हान वाटलं नाही, असंही अक्षय म्हणाला.

अक्षय गोमूत्र पितो म्हटल्याबरोबर त्याच्या चाहत्यांनी गुगलवर याचे फायदे पाहण्यासाठी (Cow unrine benefits) मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं दिसून आलं. अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी चित्रपट बेलबॉटमच्या (Bell bottom) शूटिंगसाठी हुमा कुरेशी (huma qureshi) आणि लारा दत्तासोबत स्कॉटलंडला आहे़. त्याच्या मॅन वर्सेस वाईल्ड (man vs wild akshay kumar) या कार्यक्रमातील अनुभवांबाबत त्याला हुमा कुरेशीने  विचारले असता या कार्यक्रमात त्याने हत्तीच्या शेणातून द्रव प्राशन केल्याचं सांगितले. याबाबत त्याला विचारणा केली असता़ मला याची काळजी नव्हती कारण मी नियमित गोमूत्र सेवन करतो. त्यामुळे मला त्याचे फारसे कौतुक आणि भीती वाटली नाही, असे सांगितले. मात्र त्याने हे वक्तव्य केल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी गोमूत्राचे फायदे शोधण्यासाठी गुगलवर सुरुवात केली आहे.

" isDesktop="true" id="479023" >

गोमूत्र सेवन व त्याचे फायदे, तोटे हा विषय नेहमीच वादात राहिला आहे़.  याआधी अनेक नेत्यांनी, मंत्र्यांनी गोमुत्राचे फायदे सांगितले आहेत. तर काहींनी गोमूत्राने कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब बरा होत असल्याचा दावा केला आहे़. पश्चिम बंगालचे भाजप अध्यक्ष खाासदार दिलीप घोष यांनी तर गोमूत्राने कोरोना बरा होत असल्याचं म्हटलं होतें. ही कृष्णाची भूमी असून गाईला देवाचा, मातेचा दर्जा आहे़ त्यामुळे कोरोनात काळजी नको, आपल्याकडे गोमूत्र आहे, आयुर्वेदिक औषधी घ्या व चिंता करू नका, असे त्यांनी म्हटले त्यावेळी म्हटले होते.

अक्षय कोरोनापासून बचावासाठी गोमूत्र सेवन करतो का हे आम्हाला माहीत नाही, मात्र, गोमूत्राने आजार बरे होतात याचे शास्त्रीय पुरावे सध्या उपलब्ध  नाहीत़. कोरोना संकटाच्या सुरुवातीला एप्रिलमध्ये गोमूत्राने प्रतिकारशक्ती वाढते, असेही काही बनावट संदेश व बातम्या व्हायरल झाल्या होत्या़. साहाय्यक प्राध्यापक वेंकटरामा राधाकृष्णन यांनी 2018 मध्ये म्हटले होते की, अनेक रुग्ण गोमूत्र सेवनाच्या जाळ्यात अडकतात व आपला जीव गमावून बसतात़. गोमूत्राचे सेवन केल्याने कर्करोग बरा होतो असा शास्त्रीय पुरावा नसल्याचं त्यांनी म्हटले होते़.

काय आहे गोमूत्रामागचं सत्य?

दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात सरकारच्या विविध संस्थांनी गोमूत्राच्य विविध उपचारांबाबत प्रस्ताव मागविले होते़ आणि शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन गोमूत्र कसे मधुमेह व कर्करोगावर वापरले जावू शकते किंवा त्याचे शेतीसाठी फायदे व केसांसाठी शॅम्पू व तेल तयार करता येईल यासाठी सरकारने तयारी सुरू केली होती. मात्र अनेक शास्त्रज्ञांनी याला विरोध दर्शवला असून यासाठी वापरला जाणार निधी योग्य कामांसाठी वापरण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.

First published:
top videos

    Tags: Akshay Kumar, Lifestyle