Home /News /entertainment /

Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' मालिकेत नवा ट्विस्ट, इंद्रा-दीपूच्या प्रेमाचं सत्य मालतीला कळणार

Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' मालिकेत नवा ट्विस्ट, इंद्रा-दीपूच्या प्रेमाचं सत्य मालतीला कळणार

'मन उडू उडू झालं' मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे. इंद्रा-दीपूच्या प्रेमाचं सत्य मालतीला कळणार आहे. यानंतर या दोघांना कोणत्या संकटाचा सामना करावा लागणार याचा उलगडा येणाऱ्या भागातच होईल.

    मुंबई, 14 एप्रिल- झी मराठीवरील मन उडू उडू झालं (Man Udu Udu Zhala ) मालिका छोट्या पडद्यावरली लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील इंद्रा आणि दीपूची जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. या दोघांची केमेस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या दोघांनी एकमेकांसोमर प्रेमाची कबुली दिली आहे. मात्र दीपूच्या घरच्यांना याबद्दल माहिती नाही. दीपूचं हे सत्य लवकरच मालती समोर येणार आहे. त्यामुळे आता दीपू आणि इंद्रा कोणती नवीन (Man Udu Udu Zhala Latest Episode) ) परीक्ष द्यावी लागणार हे पाहवं लागणार आहे. इंद्रा दीपूच्या केसात गजरा माळत असताना मालती पाहते व तिला दीपू आणि इंद्राचं सत्य समजते. यावेळी इंद्रा अगदी प्रेमानं दीपूला म्हमतानं दिसत आहे की, या फुलांप्रमाणे आपलं प्रेम बहरू दे तेवढ्यात कोवरी हे सगळं पाहते आणि तिला या दोघांच्यात असणाऱ्या नात्याची जाण होते. यानंतर मालती या सगळ्यावर कशी प्रतिक्रिय देणार याचा उलगडा येणाऱ्या भागातच होईल. शिवाय ती याचं नातं स्वीकारणार का देखील प्रश्न आहे. त्यामुळे दीपू आणि इंद्राला आणखी कोणती परीक्षा द्यावी लागणार का..असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत.
    View this post on Instagram

    A post shared by (@marathiserials_official)

    'मन उडू उडू झालं' मालिकेत हृता दुर्गुळे (Hruta Durgule) दिपूची भूमिका साकारत आहे. तर अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) इंद्राचे पात्र साकारत आहे. इंद्रा आणि दिपूची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. सोशल मीडियावरदेखील त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial

    पुढील बातम्या