Home /News /entertainment /

Man Udu Udu Zhala : मालती देशापांडे सरांपासून लपवणार दीपू- इंद्राच्या नात्यचं सत्य, काय होणार याचे परिणाम ?

Man Udu Udu Zhala : मालती देशापांडे सरांपासून लपवणार दीपू- इंद्राच्या नात्यचं सत्य, काय होणार याचे परिणाम ?

Man Udu Udu Zhala : दीपूच्या आणि इंद्राच्या नात्याला मालतीनं मंजुरी दिली आहे. मात्र आता मालती हे सत्य देशपांडे सरांपासून किती दिवस लपवून ठेवणार आहे हे पाहणं उत्सुकतेचे ठऱणार आहे.

  मुंबई, 18 एप्रिल- झी मराठीवरील मन उडू उडू झालं (Man Udu Udu Zhala ) मालिका छोट्या पडद्यावरली लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील इंद्रा आणि दीपूची जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. या दोघांची केमेस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या दोघांनी एकमेकांसोमर प्रेमाची कबुली (Man Udu Udu Zhala Latest Episode) दिली आहे दीपूचं हे सत्य मालती समोर आलं आहे. दीपूच्या आणि इंद्राच्या नात्याला मालतीनं मंजुरी दिली आहे. मात्र आता मालती हे सत्य देशपांडे सरांपासून किती दिवस लपवून ठेवणार आहे हे पाहणं उत्सुकतेचे ठऱणार आहे. शिवाय याचे परणिमा काय होणार याचा उलगडा देखील येणाऱ्या भागातच होणार आहे. देशापांडे सरांची काय असणार प्रतिक्रिया? नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोनुसार देशपांडे सर मालतीला म्हणजे दीपूच्या आईला म्हणताना दिसत आहेत की, तू हल्ली साळगावकराच्या घरी जास्तच रमताना दिसतेस. यावेळी मालतीच्य मनात प्रश्न निर्माण होतो की, दीपू आणि इंद्राच्या नात्याबद्दल देशपांडे सरांना आता समजलं तर...कारण ते आताच आजार पणातून बरे झाले आहेत. त्यामुळं या परिणामाचा विचार करून मालीत दीपू आणि इंद्राच्या नात्याचं सत्य देशापांडे सरांपासून लपवण्याचा प्रयत्न करते. वाचा-सुहाना, खुशी अन् अगस्त्य... हे स्टारकिड्स एकत्र करणार बॉलिवूड एंट्री अशा पद्धतीनं समोर आलं दीपू- इंद्राचं मालतीसोमर नातं? इंद्रा दीपूच्या केसात गजरा माळत असताना मालती पाहते व तिला दीपू आणि इंद्राचं सत्य समजते. यावेळी इंद्रा अगदी प्रेमानं दीपूला म्हमतानं दिसत आहे की, या फुलांप्रमाणे आपलं प्रेम बहरू दे तेवढ्यात कोवरी हे सगळं पाहते आणि तिला या दोघांच्यात असणाऱ्या नात्याची जाण होते. यानंतर मालती या सगळ्यावर कशी प्रतिक्रिय देणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती. मात्र मालतीनं या नात्याला परवानगी दिली आहे.
  View this post on Instagram

  A post shared by (@marathiserials_official)

  'मन उडू उडू झालं' मालिकेत हृता दुर्गुळे (Hruta Durgule) दिपूची भूमिका साकारत आहे. तर अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) इंद्राचे पात्र साकारत आहे. इंद्रा आणि दिपूची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. सोशल मीडियावरदेखील त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial

  पुढील बातम्या