मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Ruturaj Phadke: इंद्राचा लाडका भाऊ अडकला लग्नबंधनात; कोण आहे कार्तिकची रिअल लाईफ सानिका?

Ruturaj Phadke: इंद्राचा लाडका भाऊ अडकला लग्नबंधनात; कोण आहे कार्तिकची रिअल लाईफ सानिका?

ऋतुराज फडके

ऋतुराज फडके

'मन उडू उडू झालं' या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेला कार्तिक म्हणजेच अभिनेता ऋतुराज फडके होय. ऋतुराज फडकेने या मालिकेत मुख्य भूमिकेत असलेल्या इंद्राच्या भावाची भूमिका साकारली होती.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई, 27 जानेवारी- 'मन उडू उडू झालं' या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेला कार्तिक म्हणजेच अभिनेता ऋतुराज फडके होय. ऋतुराज फडकेने या मालिकेत मुख्य भूमिकेत असलेल्या इंद्राच्या भावाची भूमिका साकारली होती. या नकारात्मक भूमिकेला ऋतुराजने उत्तम न्याय दिला होता. नकारात्मक भूमिका असूनदेखील कार्तिकच्या माध्यमातून ऋतुराजला प्रचंड प्रेम आणि प्रतिसाद मिळाला आहे. त्याचा एक खास चाहतावर्ग आहे. त्याच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आहे. अभिनेत्याचा नुकतंच साखरपुडा पार पडला होता. त्यानंतर आता लगेचच दुसऱ्या दिवशी ऋतुराजने लग्नगाठ बांधली आहे.

झी मराठीवरील 'मन उडू उडू झालं' ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. ही मालिका सतत टीआरपीच्या शर्यतीत पुढे असायची. काही महिन्यांपूर्वी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मात्र आजही प्रेक्षक या मालिकेतील कलाकारांना प्रचंड प्रेम देत आहेत. मालिकेतील इंद्रा आणि दिपूची जबरदस्त केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडली होती. या दोघांभोवती फिरणारी ही मालिका असली तरी, मालिकेतील सर्वच कलाकारांना तितक्याच महत्वाच्या भूमिका होत्या. त्यातीलच एक भूमिका म्हणजे कार्तिकची होय. ऋतुराज फडकेने ही भूमिका साकारली होती.

(हे वाचा: Ruturaj Phadke:'मन उडू उडू झालं' फेम अभिनेता लवकरच चढणार बोहल्यावर; पार पडला साखरपुडा)

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय 'शो महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निमिष कुलकर्णीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करत ऋतुराजच्या लग्नाची माहिती दिली आहे. निमिषने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये ऋतुराज आणि प्रीतीच्या लग्नाचा फोटो शेअर करत मेरा भाई असं कॅप्शन दिलं आहे. ऋतुराजने लग्नगाठ बांधत प्रीतीसोबत नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे.

ऋतुराज फडकेने 26 जानेवारीला सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना खुश खबर दिली होती. अभिनेत्याने नुकतंच आपला साखरपुडा पार पाडला होता. ऋतुराज फडकेने प्रितीसोबत साखरपुडा करत सुदनर फोटो शेअर केले होते. त्यांनतर अवघ्या एका दिवसात अभिनेत्याने आपलं लग्नदेखील उरकलं आहे. सोशल मीडियावर त्याचे चाहते त्याला शुभेच्छा देत आहेत.

काही दिवसांपूर्वी ऋतुराज फडकेने 'झोलझाल' या मराठी सिनेमामध्ये काम केलं होतं. या सिनेमाच्या प्रदर्शनावेळी ऋतुराज फारच उत्साहात दिसून आला होता.अभिनेता सिद्धार्थ जाधव, हार्दिक जोशी अशा अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ऋतुराजचा झोलझाल सिनेमा पाहण्याची प्रेमळ विनंती प्रेक्षकांना केली होती.

First published:

Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial