मुंबई, 24 मार्च : मराठी टेलिव्हिजनवरील फार कमी कलाकार हे प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत होतात. असाच एक अभिनेता म्हणजे अजिंक्य राऊत. झी मराठीवरील मन उडू उडू झालं या मालिकेत इंद्रानं साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. इंद्रा आणि दीपू ही जोडी हिट ठरली. आधी आधात्मिक भूमिका साकारूनही प्रेक्षकांनी अंजिक्यला रोमँटिक, डॅशिंग हिरोच्या भूमिकेत स्वीकारलं. मालिकेनंतर अंजिक्य राऊत टकाटक 2मध्ये दिसला. त्याचप्रमाणे इंद्रा आण दीपू कन्नी या सिनेमातून पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. त्याआधी अंजिक्यचा आणखी एक नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज झालं असून सिनेमाचं नाव सरी असं आहे. अंजिक्यबरोबर पहिल्यांदा अभिनेत्री रितीका श्रोत्री स्क्रीन शेअर करणार आहे.
प्रेम म्हणजे दोन जीवांचे मिलन. जणू स्वर्गात बांधल्या गेलेल्या रेशीमगाठीच. पण क्षणात त्यांच्या आयुष्यात तिसरा आला तर? अशी अकल्पित प्रेमकथा असलेला 'सरी' हा सिनेमा येत्या 5 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी या सिनेमातील प्रमुख भूमिकेत असलेल्या कलाकारांचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेत. "त्याच्या, तिच्या आणि त्याच्या प्रेमाची एक अनोखी गोष्ट, सरी...", असं कॅप्शन देत अजिंक्यनी नव्या सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे. अंजिक्यच्या नव्या सिनेमाला त्याच्या चाहत्यांकडून शुभेच्छा मिळत आहे.
हेही वाचा - 'दिसायला गोड पण स्वभावाने कडक..' पोस्ट ऑफीसमध्ये प्राजक्ता माळीची एंट्री होणार बेधडक!
View this post on Instagram
मन उडू उडू झालं मालिकेतून घराघरात पोहोचलेला अजिंक्य राऊत, विविध चित्रपटांतून तरूणांच्या हृदयचा ठाव घेणारी रितिका श्रोत्री आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता पृथ्वी अंबर यांच्या प्रेमाचा त्रिकोण या पोस्टरमध्ये दिसत आहे. आता यांचे प्रेम त्यांना आयुष्याच्या कोणत्या वळणावर नेणार हे पाहणे रंजक ठरणार आहे. 'लाईफ इज फुल्ल ऑफ सरप्राइज अँड मिऱ्याकल्स.' अशी या प्रेमकथेची टॅगलाईन आहे.
प्रेमकथा असलेल्या 'सरी' या सिनेमाबद्दल दिग्दर्शक अशोका के. एस. यांनी सांगितलं की, "गेल्या काही वर्षांत मराठी सिनेमानं घेतलेली भरारी मी पाहिली आहे. मी दाक्षिणात्य सिनेसृष्टीत कार्यरत असलो, तरी मराठी सिनेमा आवर्जून पाहतो. त्यामुळेच मराठी सिनेमातं दिग्दर्शन करण्याची इच्छा होती. ती संधी मला 'सरी' या सिनेमाद्वारे मिळाली आहे. प्रेक्षकांना ही प्रेमकथा नक्कीच भावेल."
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.