Home /News /entertainment /

Man Udu Udu Zala: दीपूच्या भूमिकेसाठी आधी 'या' अभिनेत्रीने दिलं होतं ऑडिशन; आता त्याच मालिकेत साकारतेय वेगळी भूमिका

Man Udu Udu Zala: दीपूच्या भूमिकेसाठी आधी 'या' अभिनेत्रीने दिलं होतं ऑडिशन; आता त्याच मालिकेत साकारतेय वेगळी भूमिका

'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zal) ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका बनली आहे.या मालिकेने अल्पावधीतच मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. मालिकेत सतत येणाऱ्या ट्विस्ट अँड टर्न्समुळे ही मालिका प्रचंड चर्चेत असते. मालिकेतील इंद्रा आणि दीपूची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडत आहे. शिवाय या मालिकेतील दीपू आणि शलाका (Deepu & Shalaka) या बहिणींमध्ये दाखवण्यात आलेलं बॉन्डिंग सर्वांच मन जिंकत आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 16 जून- 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zala) ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका बनली आहे.या मालिकेने अल्पावधीतच मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. मालिकेत सतत येणाऱ्या ट्विस्ट अँड टर्न्समुळे ही मालिका प्रचंड चर्चेत असते. मालिकेतील इंद्रा आणि दीपूची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडत आहे. शिवाय या मालिकेतील दीपू आणि शलाका  (Deepu & Shalaka)  या बहिणींमध्ये दाखवण्यात आलेलं बॉन्डिंग सर्वांच मन जिंकत आहे. परंतु तुम्हाला माहितेय का? दीपूच्या भूमिकेसाठी आधी 'या' अभिनेत्रीने ऑडिशन दिलं होतं. 'मन उडू उडू झालं' ही मालिका सध्या एका रंजक वळणावर आहे.एकंदरीत सांगायचं झालं तर, या लोकप्रिय मालिकेत देशपांडे गुरुजींच्या तीन मुली दाखविण्यात आल्या आहेत. दिपू, शलाका आणि सानिका अशा या लेकींची नावे आहेत. यामधील सानिका ही फटकळ आणि कोणाशीही न पटवून घेणारी आहे. तर दिपू आणि शलाका यांच्यात खूप चांगलं बॉन्डिंग दाखविण्यात आलं आहे. या दोघीही अतिशय समजुतदार आणि कठीण काळात ठामपणे एकमेकींच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या आहेत. त्यामुळे मालिकेतील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडते.
  View this post on Instagram

  A post shared by (@marathiserials_official)

  मालिकेत हृताने  (Hruta Durgule)  दिपूची तर अभिनेत्री शर्वरी कुलकर्णीने  (Sharvari Kulkarni)  शलाकाची भूमिका साकारली आहे. शलाकाच्या भूमिकेला प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळत आहे. साधीभोळी आणि हळवी शलाका प्रत्येकांच्या पसंतीस उतरली आहे. मात्र तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, शलाका अर्थातच अभिनेत्री शर्वरी कुलकर्णीने दीपूच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिलं होतं. मात्र नंतर तिची निवड शलाकाच्या भूमिकेसाठी करण्यात आली होती.याबाबतचा रिपोर्ट मराठी सिरियल्स डॉट कॉमने दिला आहे. शलाका ही भूमिकासुद्धा प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. (हे वाचा:राणाचा भाऊ दिसणार नव्या मालिकेत; राज हंचनाळे झळकणार मुख्य भूमिकेत ) शर्वरी कुलकर्णी ही प्रसिद्ध अभिनेत्री संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांची लेक आहे. शर्वरी कुलकर्णी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले सुंदर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. या अभिनेत्रीला ट्रॅव्हलिंगची प्रचंड आवड आहे. त्यामुळे तिच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर भटकंतीचे अनेक फोटो दिसून येतात.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment

  पुढील बातम्या