Home /News /entertainment /

दीपू-इंद्रामध्ये पुन्हा येणार दुरावा? मालतीने हात जोडून केली अशी विनंती

दीपू-इंद्रामध्ये पुन्हा येणार दुरावा? मालतीने हात जोडून केली अशी विनंती

छोट्या पडद्यावरील 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zal) ही मराठी मालिका प्रचंड लोकप्रिय झाली आहे. अल्पावधीतच या मालिकेचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. मालिकेत येणारे ट्विस्ट अँड टर्न्स प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहेत. सध्या मालिका आणखी एका रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई,22 एप्रिल- छोट्या पडद्यावरील 'मन उडू उडू झालं'   (Man Udu Udu Zal)  ही मराठी मालिका प्रचंड लोकप्रिय झाली आहे. अल्पावधीतच या मालिकेचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. मालिकेत येणारे ट्विस्ट अँड टर्न्स प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहेत. सध्या मालिका आणखी एका रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे.आपल्या प्रेमासाठी इंद्रा  (Indra)  आणि दिपूला  (Deepu)  आणखी एक अग्निदिव्य पार करावं लागणार असल्याचं दिसून येत आहे. पाहूया मालिकेत नेमकं काय घडलंय? झी मराठीवर प्रसारित होणारी 'मन उडू उडू झालं' ही मालिका तरुण वर्गात प्रचंड लोकप्रिय असल्याचं दिसणं येतं. या मालिकेतील इंद्रा आणि दीपूची जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. या दोघांची केमेस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या दोघांनी एकमेकांसोमर प्रेमाची कबुली (Man Udu Udu Zhala Latest Episode) दिली आहे. दीपू आणि इंद्राचं हे सत्य नुकतंच मालती म्हणजेच अभिनेत्रीच्या आईसमोर आलं आहे. दीपूच्या आणि इंद्राच्या नात्याला मालतीनं मंजुरीसुद्धा दिली होती. मात्र मालती हे सत्य देशपांडे सरांपासून लपवून ठेवणार होती. याचे परिणाम काय होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार होतं. दरम्यान आता मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये मालतीचं मन बदलेलं दिसून येत आहे. त्यामुळे आता इंद्रा आणि दीपूच्या नात्याचं काय होणार? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. कारण नुकतंच समोर आलेल्या प्रोमोमध्ये दीपूची आई इंद्रा आणि दीपूला म्हणत आहे, 'इंद्राचं हे गुंड असल्याचं रूप जर देशपांडे सरांच्यासमोर आलं तर ते कधीच लग्नाला परवानगी देणार नाहीत. यावर दीपू आणि इंद्रा टेन्शनमध्ये येतात. त्यांनतर इंद्रा दीपूच्या आईला म्हणतो, 'हो आहे मी गुंड, मी करतो वसुलीचं काम परंतु दीपिका मॅडमवर असलेलं माझं प्रेम कधीच कमी होणार नाही'. या प्रोमोनंतर दीपू आणि इंद्रामध्ये पुन्हा दुरावा येणार असल्याचं दिसून येत आहे.
  View this post on Instagram

  A post shared by (@marathiserials_official)

  गेल्या एपिसोडमध्ये इंद्रा दीपूच्या केसात गजरा माळत असताना मालतीने पाहिलं होतं व त्यांना दीपू आणि इंद्राच्या नात्याचं सत्य समजलं होतं. यावेळी इंद्रा अगदी प्रेमानं दीपूला म्हणताना दिसला होता की, 'या फुलांप्रमाणे आपलं प्रेम बहरू दे तेवढ्यात मालती हे सगळं पाहते आणि तिला या दोघांच्यात असणाऱ्या नात्याची जाण होते. यानंतर मालती या सगळ्यावर कशी प्रतिक्रिय देणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती. मात्र मालतीनं त्यांच्या नात्याला परवानगी दिली होती. त्यांनतर पुन्हा आता हा ट्विस्ट आल्याने छते उत्सुक झाले आहेत.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial

  पुढील बातम्या