मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील अभिनेत्याच्या कारला भीषण अपघात ; थोडक्यात बचावला जीव

‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील अभिनेत्याच्या कारला भीषण अपघात ; थोडक्यात बचावला जीव

 मन उडू उडू झालं मालिकेतील अभिनेता अजिंक्य राऊत ( ajinkya raut )याचा जीव थोडक्यात बचावला आहे. दिवाळीनिमित्त तो त्याच्या मुळगावी परभणीला जात असतानाचा त्याच्या कारला भीषण अपघात झाला.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 9 नोव्हेंबर- मन उडू उडू झालं मालिकेतील अभिनेता अजिंक्य राऊत ( ajinkya raut )याचा जीव थोडक्यात बचावला आहे. दिवाळीनिमित्त तो त्याच्या मुळगावी परभणीला जात असतानाचा त्याच्या कारला भीषण अपघात झाला. सुदैवाने या अपघातामधून सगळे सुखरूप बाहेर पडले. याबद्दलचा एक व्हिडीओ अंजिक्यने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अजिंक्य राऊतने अपघाताच्या काही क्लिपस शेअर करत त्याच्यावर ओढवलेल्या या प्रसंगाबद्दल सांगितलं आहे. दिवाळीनिमित्त गिफ्ट घेऊन मित्रांसोबत गावी जात असताना गाडी स्किट होऊन ती खांबावर आदळणार हे पाहून गाडी बाजूला घेतली तर ती थेट उताराच्या दिशेने खाली लांब झुडपात जाऊन अडकली. तो म्हणतो, सुदैवाने आम्ही बचावलो सुदैवाने तेथे दरी असणारा रोड नव्हता. आमची गाडी थेट 11०० वोल्टच्या खांबावर जाऊन आदळणार होती त्यामुळे मित्राने गाडी बाजूला घेतली तर ती थेट खाली झुडपात जाऊन अडकली. या झुडपामुळे आम्ही वाचलो.

वाचा : Bigg Boss Marathi: नीथा शेट्टीनं केली शो सोडण्याची मागणी; वाचा नेमकं काय घडलं

देवाच्या कृपेने आम्ही वाचलो व आम्हाला ही दिवाळी बघता आली. यातून मला एक चांगली गोष्ट शिकायला मिळाली ती अशी की, कुठलाच अवार्ड कुठलेच मेडल अश्या प्रसंगामुळे काहीच वाटत नाहीत सारं काही क्षणार्धात नष्ट होण्यासारखं आहे. त्यामुळे तुम्ही देखील तुमची आणि तुमच्या घरच्यांची काळजी घ्या. ही व्हिडीओची क्लिप टाकताना त्याने पुन्हा एकदा नमूद केलं कि त्यावेळी मी गाडी चालवत नव्हतो. आता पुन्हा गावी चाललोय.

गाडी थोडीफार पुढून आणि मागून दोन्ही बाजूने बरीचशी चेपलेली पाहायला मिळत आहे. गाडी त्या झुडपातून काढताना देखील त्यांना ट्रॅक्टर बोलवावा लागला. ट्रॅक्टरला दोरी बांधून गाडी झुडपातून बाहेर काढावी लागल्याची क्लिप देखील त्याने शेअर केली आहे.

वाचा : Bigg Boss Marathi: नीथा शेट्टीनं केली शो सोडण्याची मागणी; वाचा नेमकं काय घडलं

मन उडू उडू झालं हि मालिका सध्या तुफान गाजतेय काही दिवसातच मालिकेने चांगला प्रेक्षक वर्ग निर्माण केला आहे, अभिनेत्री ऋता दुर्गुळे आणि अभिनेता अजिंक्य राऊत ह्यांनी ह्या मालिकेत प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

First published:

Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial