Home /News /entertainment /

सानिकाच्या प्रेग्नेन्सीचं सत्य, आणणार दीपू-इंद्रामध्ये दुरावा? 'मन उडू उडू झालं' मध्ये मोठा ट्विस्ट

सानिकाच्या प्रेग्नेन्सीचं सत्य, आणणार दीपू-इंद्रामध्ये दुरावा? 'मन उडू उडू झालं' मध्ये मोठा ट्विस्ट

सानिका आणि कार्तिकच्या चुकीचा परिणाम इंद्रा (Indra) आणि दिपूच्या (Deepu) नात्यावर होत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान आता सानिका प्रेग्नेंट असल्याचं सत्य समोर आलं आहे.

  मुंबई, 9 मार्च-   सध्या अनेक मराठी मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. यातीलच एक म्हणजे 'मी उडू उडू झालं'  (Man Udu Udu Zal)  होय. या मालिकेने अल्पववधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. मालिकेत दररोज येणाऱ्या नवनवीन ट्विस्ट अँड टर्न्समुळे प्रेक्षक अगदी खिळून आहेत. सानिका आणि कार्तिकच्या चुकीचा परिणाम इंद्रा (Indra)  आणि दिपूच्या  (Deepu)  नात्यावर होत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान आता सानिका प्रेग्नेंट असल्याचं सत्य समोर आलं आहे. झी मराठीवर 'मन उडू उडू झालं' ही मालिका प्रसारित होते. या मालिकेने अल्पावधीतच मोठा प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे. मालिकेत सध्या दीपूची बहीण सानिका आणि इंद्राचा भाऊ कार्तिक यांच्या गुपचूप लग्नामुळे मालिकेत अनेक नवनवीन ट्विस्ट येत आहेत. त्या दोघांची एक चूक लपवण्यासाठी इंद्रा आणि दीपूलासुद्धा कुटुंबाशी खोटं बोलावं लागत आहे. त्यामुळे इंद्रा आणि दीपू सतत तणावात असल्याचं दिसून येत आहे.
  नुकतंच या मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये सानिका प्रेग्नेंट असल्याचं समोर आलं आहे. सानिकाच्या या खुलास्यानंतर आता इंद्रा आणि दीपू ही परिस्थिती कसं हाताळतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. या गोष्टीमुळे कोणत्या नव्या अडचणी येणार आणि सर्वांचा त्या दोघांच्या प्रेमावर काय परिणाम होणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. खरं तर सानिका कार्तिकच्या घरी जाऊन त्याची बायको असल्याची ओळख मिळविण्यासाठी धडपडत आहे. परंतु त्यांनी गुपचूप लग्न केल्यामुळे हे सत्य घरच्यांना सांगणं कठीण झालं आहे. (हे वाचा: आज राणादा झाल्यासारखं वाटतंय', पाठकबाईंना लाल साडीत पाहून चाहते सैराट) अशातच इंद्राचा भाऊ कार्तिक सानिकाची जबाबदारी स्वीकारायला आढेवेढे घेत आहे. त्यामुळे सानिकाचा पारा चढला आहे. दरम्यान सानिकाने ठरवलं आहे, काहीही झालं तरी ती कार्तिकच्या घरी त्याची बायको म्हणून जाणारच. त्यासाठी तिला अवतरेल ते करायला लागलं तरी ती मागे हटणार नाही असा निश्चय केला आहे. आणि याच दरम्यान ती दीपूला आपल्या प्रेग्नेंसीचं सत्य सांगते. मग खरंच सानिका प्रेग्नेंट आहे की कार्तिकच्या घरी जाण्यासाठी तिने हे नाटक केलं आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Marathi entertainment, Tv serial, Zee marathi serial

  पुढील बातम्या