Home /News /entertainment /

'मन उडू उडू झालं' फेम इंद्राची चित्रपटात वर्णी, अजिंक्य राऊत सिनेमातून येणार भेटीला

'मन उडू उडू झालं' फेम इंद्राची चित्रपटात वर्णी, अजिंक्य राऊत सिनेमातून येणार भेटीला

'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zal) या मालिकेतून अभिनेता अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) घराघरात पोहोचला आहे. या मालिकेमुळे त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.

  मुंबई, 26 फेब्रुवारी-   'मन उडू उडू झालं'  (Man Udu Udu Zal)  या मालिकेतून अभिनेता अजिंक्य राऊत (Ajinkya Raut)  घराघरात पोहोचला आहे. या मालिकेमुळे त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. आज त्याचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. त्यामुळे चाहते नेहमीच त्याच्याबद्दल जाणून घ्यायला उत्सुक असतात. अजिंक्यच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आहे. हा अभिनेता आता मोठ्या पडद्यावरसुद्धा झळकणार आहे. लवकरच एका चित्रपटाच्या माध्यमातून अजिंक्य प्रेक्षकांच्या  (Upcoming film)  भेटीला येणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अजिंक्य राऊतची एका चित्रपटात वर्णी लागली आहे. त्यामुळे तो लवकरच चित्रपटातून आपल्या भेटीला येणार आहे. ही माहिती समोर येताच अभिनेत्याचे चाहते फारच उत्सुक झाले आहेत. मालिकेत डॅशिंग पण तितकाच प्रेमळ असणारा इंद्रा चित्रपटात कशी भूमिका साकारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. परंतु अजिंक्य राऊतने याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाहीय. शिवाय हा चित्रपट कोणता असणार? नेमकं कथानक काय असणार? बाकीची स्टार कास्ट कोण असणार? याबद्दल काहीच माहिती सध्या समोर आलेली नाहीय.
  View this post on Instagram

  A post shared by (@marathiserials_official)

  अजिंक्य राऊत सध्या झी मराठीवरील 'मन उडू उडू झालं' या मालिकेत इंद्राची भूमिका साकारत आहे. या मालिकेच्या निमित्ताने त्याची जोडी अभिनेत्री हृता दुर्गुळेसोबत जमली आहे. या मालिकेत हृता दीपूच्या भूमिकेत आहे. प्रेक्षकांना इंद्रा आणि दीपूची केमिस्ट्री प्रचंड पसंत पडत आहे. सोशल मीडियावर सतत या मालिकेची चर्चा होत असते. शिवाय मालिका टीआरपी रेसमध्येही नेहमीच पुढे असते. शांत, सुशिक्षित, एका शिस्तबद्ध शिक्षकाची मुलगी दीपू आणि एका टपोरी, डॅशिंग परंतु तितकाच प्रेमळ आणि सत्याची साथ देणारा इंद्रा अशी ही हटके जोडी आहे. (हे वाचा:माजी खासदार आणि नागरिकांचा माझ्या लढ्याला पाठिंबा’ किरण मानेंची नवी पोस्ट) इंद्रा म्हणजेच अजिंक्य राऊतने याआधीही मालिकेत काम केलं आहे. अजिंक्य राऊतने 'विठू माऊली' या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. या मालिकेत अजिंक्य विठू रायाच्या भूमिकेत दिसला होता. अजिंक्य अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी मुंबईत आला आहे. तो मूळचा परभणीचा आहे. सध्या 'मन उडू उडू झालं' या मालिकेने त्याला चांगलं यश मिळवून दिलं आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Marathi cinema, Marathi entertainment, Upcoming movie, Zee marathi serial

  पुढील बातम्या