Home /News /entertainment /

इतरांप्रमाणे अभिनेत्याची उडवली जात होती भाषेवरून खिल्ली, सांगितला पुण्या- मुंबईतला धक्कादायक अनुभव

इतरांप्रमाणे अभिनेत्याची उडवली जात होती भाषेवरून खिल्ली, सांगितला पुण्या- मुंबईतला धक्कादायक अनुभव

झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्याची त्याच्या मराठवाडा मायबोलीमुळे पुण्या- मुंबईतील लोकांकाडून खिल्ली उडवली जात होती. या सगळ्या प्रकाराबद्दल त्यानं नुकतचं सांगितलं आहे.

  मुंबई, 28 फेब्रुवारी- 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zal) या मालिकेतून अभिनेता अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) घराघरात पोहोचला आहे. या मालिकेमुळे त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. आज त्याचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ( Marathi Language Day) अजिंक्य राऊतचा एक व्हिडिओ झी मराठीनं नुकताच शेअर केला होता. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. बऱ्याचवेळा ग्रामीण भागातून पुण्या मुंबईत आलेल्या मुलांना त्यांच्या भाषेवरून चिडवलं जातं किंवा त्यांची खिल्ली उडवली जाते. अंजिक्याच्या बाबतीत देखील असाच प्रकार घडल्याचे त्याने याव्हिडिओतून सांगितलं आहे. झी मराठीनं इन्स्टावर अंजिक्यचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये अंजिक्या सांगताना दिसत आहे की, मी मराठवाड्यातला असल्याने आणि मी तिकडेच राहिल्याने माझी भाषा देखील तशीच होती. जेव्हा कामासाठी मी पुण्या- मुंबईत आलो तेव्हा समजलं की, इकडे वेगळ्या आणि विशिष्ट पद्धतीची भाषा बोलली जाते. त्यावेळी माझ्या मनात एका भावना बिंबवली गेली की, मी जी भाषा बोलतोय ती किती अशुद्ध, चुकीची आहे. मग माझ्या मनात कमीपमाची आणि गुन्हेगारीची भावना निर्माण झाली. वाचा-PHOTOS : 'नमस्ते मेरा नाम है मोनिका...' कशी वाटली झुंडमधील आर्ची? मी यासाठी माझी भाषा बदलण्याचा प्रयत्न केला. यामुळं माझी खिल्ली उडवण्यात आली. माझ्या मित्र मंडळीकडून असेल किंवा इकडे राहणाऱ्या लोकांकडून माझी खिल्ली उडवली गेली. त्यामुळे माझ्या मनात भाषेबद्दल गुन्हेगारीची भावना निर्माण झाली. मग मी मराठी भाषा सोडून परप्रांतिय भाषा बोलू लागलो.  कामासाठी अनेक परप्रांतिय भाषा शिकल्या व यासाठी माझा सत्कार देखील झाला. त्यामुळे एक -दोन शहरात बोलली जाणारी मराठी भाषा फक्त शुद्द ..इतकी संकुचित आपली मराठी भाषा नाही. त्यामुळे मायबोलीला महत्त्व देण गरजेचे असल्याचे अंजिक्य यातून सांगताना दिसतो.
  ग्रामीण भागातील आलेली विद्यार्थी असतील किंव आणि कोण यांच्या भाषेची नेहमीच खिल्ली उडवली जाते. यापूर्वीही बिग बॉस मराठीच्या घरात कोल्हापूरच्या सोनाली पाटीलच्या बोलण्याची तिच्या भाषेची मीरा जगन्नाथने अशीच खिल्ली उडवली होते. सर्वसामान्यप्रमाणे कलाकारांना देखील अशा प्रकाराला सामोरे जावे लागते. सध्या काही मराठी मालिकांमध्ये देखील कोल्हापूरी, सोलापूरी स्टाईलनं बोलल्याचे दिसून येते. त्यामुळे प्रत्येकाच्या मायबोलीचा आदार करणंही महत्त्वाचं आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial

  पुढील बातम्या