मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Man Udu Udu Jhala: मालिका संपताना चाहत्याला कोसळलं रडू; अभिनेत्याला केला भावुक मेसेज

Man Udu Udu Jhala: मालिका संपताना चाहत्याला कोसळलं रडू; अभिनेत्याला केला भावुक मेसेज

Man Udu Udu Jhala serial last episode

Man Udu Udu Jhala serial last episode

मन उडू उडू झालं मालिकेचा आज शेवट होणार आहे. हृता अजिंक्यच्या या जोडीला चाहते भरपूर मिस करताना दिसणार आहेत.

  मुंबई 13 ऑगस्ट: मन उडू उडू झालं ही मालिका आज प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. आज मालिकेचा शेवटचा एपिसोड दाखवला जाणार असून मालिकेचे कलाकारच नव्हे तर चाहते सुद्धा भावुक झाले आहेत. या मालिकेने अल्पावधीतच एक मोठा चाहतावर्ग तयार केला. इंद्रा दिपूची ही जोडी चाहत्यांना आजही हवीहवीशी वाटत आहे आणि कोणालाही या मालिकेचा शेवट होऊ नये असच वाटत आहे. (man udu udu jhala) मालिकेचा शेवट होताना एका चाहत्याने कलाकारांना केलेला मेसेज सध्या खूप viral होत आहे. ऋतुराज फडके या अभिनेत्याला एका चाहत्याने अगदी भावुक होऊन एक मेसेज पाठवला असून ज्यात त्याने मालिकेबद्दल त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. “अगदी सुरुवातीपासून शेवट्पर्यंत एक एपिसोड सोडला नाही. आणि उद्या शेवट खूप वाईट वाटतंय. प्रति अशी सिरीयल कधी बघायला मिळेल काय माहित आता. 31 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट हा काळ आम्हा प्रेक्षकांसाठी सुवर्णकाळ ठरला होता.” असं या चाहत्याने त्याच्या भावना व्यक्त करत लिहिलं आहे. या मेसेजचा एक फोटोसुद्धा सध्या viral होत आहे. Man Udu Udu Jhala fans
  Man Udu Udu Jhala fans
  मालिकेच्या निमित्ताने हृता आणि अजिंक्यला सुद्धा भरभरून प्रेम मिळालं. त्यांच्या भूमिकेचे हजारो फॅनक्लब आज सुरु आहेत जे हृजिंक्य किंवा इंद्रादिप नावाने प्रसिद्ध आहेत. प्रत्येक फॅनपेजकडून त्यांच्या या प्रवासाला आज भरभरून प्रेम दिलं जात आहे. हृता अजिंक्य या जोडीने प्रेक्षकांना वेड लावल्याचं यानिमित्ताने कळून आलं आहे. हे ही वाचा- वर्गात विद्यार्थी नवे पण मास्तर तेच! Bigg Boss Marathi 4 साठी महेश मांजरेकरच करणार सूत्रसंचालन; प्रोमो आऊट स्वतः हृता आणि अजिंक्य सुद्धा आजच्या दिवशी भावुक झाले आहेत. हृताने आज सोशल मीडियावर पोस्ट आणि स्टोरी शेअर करत चाहत्यांचे आणि प्रेक्षकांचे आभार मानले.
  तिच्यासाठी दिपू किती जवळची आहे हे तिने शेअर केलं. तर अजिंक्यने काहीच दिवसांपूर्वी पोस्ट शेअर करून मालिकेच्या टीमचे आणि प्रेक्षकांचे आभार मानले होते. या टीमचं नातं आणि ही मालिका विसरणं प्रेक्षक नव्हे तर कलाकारांना सुद्धा कठीण जाणार हे यातून दिसून येत आहे.
  Published by:Rasika Nanal
  First published:

  Tags: Marathi entertainment, Zee Marathi, Zee marathi serial

  पुढील बातम्या