मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Ajinkya Raut: मालिकेच्या शेवटच्या आठवड्यात अजिंक्यने मानले प्रेक्षकांचे आभार; हृताबरोबर शेअर केले क्युट फोटो

Ajinkya Raut: मालिकेच्या शेवटच्या आठवड्यात अजिंक्यने मानले प्रेक्षकांचे आभार; हृताबरोबर शेअर केले क्युट फोटो

अजिंक्य राऊत उर्फ चाहत्यांचा लाडका इंद्रा आता मालिकेत थोड्या काळासाठी दिसणार आहे. मन उडू उडू झालं मालिका शेवटच्या टप्प्यात पोहोचली असताना अजिंक्यची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत येत आहे.

  मुंबई 09 ऑगस्ट: मन उडू उडू झालं ही मालिका सध्या शेवटच्या आठवड्यात प्रवेश करताना दिसत आहे. मालिकेचा आत्तापर्यंतचा प्रवास एवढा रंजक होता की मालिकेबद्दल आजही तेवढीच लोकप्रियता कायम असल्याचं समोर आलं आहे. (man udu udu jhala) मालिकेचा निरोप घ्यायला अनेकजणांना जड जात आहे तसंच कलाकारांना सुद्धा मालिका बंद होत असल्याचं दुःख आहे हे समोर आलं आहे. अजिंक्य राऊत म्हणजे प्रेक्षकांचा लाडका इंद्रा सध्या काही पोस्टच्या माध्यमातून मालिकेबद्दल व्यक्त होताना दिसून आला आहे. अजिंक्यने अनेक फोटोंच्या माध्यमातून मालिकेच्या मेकर्सचे आभार मानले आहेत. तसंच रसिकप्रेक्षकांना सुद्धा धन्यवाद देत इंद्रा-दिपूच्या जोडीला भरभरून प्रेम दिल्याबद्दल तो व्यक्त होताना दिसला आहे. “इंद्रा-दिपूच्या जोडीला प्रेम दिल्याबद्दल खूप थँक यु. एक अत्यंत सुंदर दिग्दर्शक, कायम सपोर्ट करणारं चॅनेल, हटके आणि अप्रतिम संकल्पना, स्ट्रॉंग आणि उत्तम भूमिका, टॅलेंटेड को-ऍक्टर्स, खूप सारी केमिस्ट्री आणि त्याहूनही जास्त रसिकांचं मिळालेलं प्रेम, माझ्यासाठी हे आहे ‘मन उडू उडू झालं’.”
  मालिकेच्या दिग्दर्शकांचे, स्पेशली हृताचे आभार मनात अजिंक्यने खास पोस्ट शेअर केली आहे जी सध्या लक्षवेधी ठरत आहे. मालिकेतील अजिंक्यच्या पात्राला तुफान लोकप्रियता आणि प्रेम मिळालं आहे. हे ही वाचा- Bhargavi Chirmuley: माहोल मुली घेऊन आल्यायेत मराठीची व्हरायटी;भार्गवीचा हा video पाहाच जेव्हा मालिका संपणार अशी माहिती समोर आली तेव्हापासूनच चाहते निराश असल्याचं बघायला मिळालं आहे. मालिकेच्या टीमने शूटिंग संपल्यानंतर जंगी सेलिब्रेशन केल्याचंही समोर आलं होतं. तसंच सगळ्याच टीमचं एकमेकांशी असलेलं घट्ट नातं यानिमित्ताने चाहत्यांना बघायला मिळालं होतं.
  मन उडू उडू झालं मालिकेचा हा शेवटचा आठवडा असून त्याची जागा नवी मालिका ‘तू चाल पुढं’ घेणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने दीपा परब ही अभिनेत्री पुन्हा मालिका विश्वात दिसणार आहे.
  Published by:Rasika Nanal
  First published:

  Tags: Marathi entertainment, Zee Marathi

  पुढील बातम्या