Home /News /entertainment /

मराठमोळ्या अभिनेत्रीचं अंडरवॉटर फोटोशूट चर्चेत, Video Viral

मराठमोळ्या अभिनेत्रीचं अंडरवॉटर फोटोशूट चर्चेत, Video Viral

अंडरवॉटर फॅशन फोटोशूट करणार रीना ही पहिली मराठी अभिनेत्री आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांकडून व कलाकारांकडूही कौतुकाचा वर्षाव होत आहे.

  मुंबई, 10 मार्च : बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी अंडरवॉटर फोटोशूट केले आहे. पण मराठीत अंडरवॉटर फॅशन फोटोग्राफी करताना कोण दिसत नाही. मन उडू उडू झालं मालिकेत सानिकाची भूमिका साकराणारी अभिनेत्री रीना मधुकर (Reena Madhukar) हिनं नुकतचं अंडरवॉटर फोटोशूट ( underwater photoshoot ) केले आहे. तिच्या अंडरवॉटर फोटोशूटचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चाहत्यांकडून तिच्या या फोटोशूटचं कौतुक होत आहे. रीनाने तिच्या अंडरवॉटर फोटोशूटचा एक व्हिडिओ नुकताच शेअर केला आहे. यामध्ये रीनाने पाण्याखाली जाऊन कसं फोटोशूट केलं हे दाखवण्यात आलं. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांकडून व कलाकारांकडूही कौतुकाचा वर्षाव होत आहे. असं फोटोशूट करणारी रीना ही पहिली मराठी अभिनेत्री आहे. पाण्याच्या खाली जाऊन फोटोसाठी पोझ देणे, चेहऱ्यावरील हावभाव अगदी अचूक दाखवणे ही खरोखर एक कला आहे आणि रीनाने या सगळ्या गोष्टी अगदी जमवून आणल्या आहेत. यासाठी तिचं सर्वांकडून कौतुक होत आहे. वाचा-'राणाजींबरोबरचं लग्न टिपिकल नव्हतं' रेणुका यांनी सांगितला आहेराचा किस्सा सोशल मीडियावर तिच्या अंडरवॉटर फोटोशूटचे काही फोटो व्हायरल झाले होते. आता याचा व्हिडिओ रीनानं इन्साटावर शेअर केला आहे. रीनानं केलेल्या फोटोशूटमध्ये कपडे, मेकअप याला पण विशेष महत्त्व असते. रीनाची स्टायलिस्ट निकेता बांदेकर, मेकअप आर्टिस्ट निखिल पवार यांनी पण पाण्याखाली कोणत्या प्रकारचं फॅब्रिक जास्त रेखीव दिसेल, याचा विचार करून तिचा मेकअप केल्याचे दिसत आहेत.
  'मन उडू उडू झालं' ही रीनाची पहिली मराठी मालिका आहे. या मालिकेत ती 'सानिका देशपांडे'ची भूमिका साकारत आहे जी नायिका साकारत असेल्या हृता दुर्गुळेची ऑनस्क्रीन बहिण दाखवली आहे. यापूर्वी रीनानं मराठी सिनेमांत काम केले आहे. हिंदी मनोरंजनसृष्टीमध्ये देखील रीनाने तिची स्वत:ची ओळख तयार केली आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial

  पुढील बातम्या