Home /News /entertainment /

Man Udu Udu Jhala: बँड बाजा वाजणार अखेर दीपू शुद्धीवर येणार; इंद्राची लव्ह स्टोरी प्रेमाचा कट मारणार

Man Udu Udu Jhala: बँड बाजा वाजणार अखेर दीपू शुद्धीवर येणार; इंद्राची लव्ह स्टोरी प्रेमाचा कट मारणार

Man Udu Udu Jhala: बँड बाजा वाजणार अखेर दीपू शुद्धीवर येणार; इंद्राची लव्ह स्टोरी प्रेमाच कट मारणार

Man Udu Udu Jhala: बँड बाजा वाजणार अखेर दीपू शुद्धीवर येणार; इंद्राची लव्ह स्टोरी प्रेमाच कट मारणार

दीपूसाठी सर्वांनी केलेली प्रार्थना फळाली आली असून दीपू कोमातून बाहेर येणार आहे. सर्वांत मोठी गोष्ट म्हणजे इंद्रा आणि दीपूची लव्ह स्टोरी ट्रॅकवर येणार आहे.

  मुंबई, 02 जून:  झी मराठीवरील ( Zee Marathi) सर्वांची लाडकी मालिका म्हणजे 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Jhal) मालिकेत मागील काही  दिवसांपासून आलेल्या इमोशन ट्रॅकमुळे मालिका काहीशी संथ वाटत होती. दीपूच्या अपघातामुळे मालिकेला वेगळं वळणं आलं होतं.  पण मालिका आता मुळ ट्रॅकवर येणार आहे. कारण मालिकेतून दीपू अखेर शुद्धीवर येणार आहे. दीपूसाठी सर्वांनी केलेली प्रार्थना फळाली आली असून दीपू कोमातून बाहेर येणार आहे. यातील सर्वांत मोठी गोष्ट म्हणजे इंद्रा आणि दीपूची लव्ह स्टोरी (Indra Deepu Love Story) ट्रॅकवर येणार आहे.  इंद्रा दीपूच्या प्रेमात आलेले अडथळे पार करत अखेर इंद्रा त्याच्या मनातील भावना दीपूसमोर पुन्हा एकदा बोलून दाखवणार आहे. मालिकेतील दीपूच्या नव्या एंट्रीचा भागही काहीसा खास असणार आहे. मन उडू उडू झालं मालिकेच्या येत्या भागात आपण पाहणार आहोत की, डॉक्टर दीपूची प्रकृती सुधारणार असल्याचं सांगतात ती लवकरच शुद्धी येणार आहे. दीपू शुद्धीवर येणार असल्याचं कळताच इंद्राचा आनंद गगनात मावेनासा होतो. दीपू शुद्धीवर येताच तिला चांगलं वाटावं म्हणून इंद्रा हॉस्पिटलमधील दीपूच्या रुमची सजावट करतो. इंद्रा संपूर्ण रुमला फुग्यांची सजावट करतो. सत्तू देखील इंद्राला मदत करत असताना त्याला विचारतो, 'मॅडमना घरी नेण्यासाठी बँड बाजा वैगैरे मागवलं आहेस की नाही', त्यावर इंद्रा सत्तूला म्हणतो, 'आणणार ना बँड बाजा सगळं आणणार पण आमच्या लग्नात. दीपिका मॅडम आणि मी एकदम थाटात लग्न करणार'. हेही वाचा - असंभव ! 12 वर्षांनी एकत्र आलेले हे चेहरे; एकेकाळी छोट्या पडद्यावर यांचीच होती दहशत, आठवतय का? सत्तू आणि इंद्रा खोलीची सजावट करत असताना तिथे सिस्टर येते आणि 'तुम्ही हे काय करता' असं विचारते. तर तितक्यात दीपूला शुद्ध येते. शुद्धीवर येताच दीपू पहिल्यांदा इंद्राला पाहते. दोघांना वेळ देण्यासाठी सत्तू तिथून निघून जातो. तेव्हा इंद्रा दीपूचा हात हातात घेऊन तिला म्हणतो, 'मॅडम तुम्ही मोठ्या संकटातून वाचून आलात. हा केवळ तुमचा पुनर्जन्म नाहीये तर आपल्या प्रेमाचा, इंद्रा आणि दीपिकाच्या प्रेमाचा पुनर्जन्म आहे'. मालिकेच्या या प्रोमो नंतर प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केलाय. दीपू ठिक होऊन इंद्रा दीपूची लव्ह स्टोरी ट्रॅकवर येणार असल्याचे मालिकेचे चाहते खुश आहेत. मात्र काहींनी कमेंट करत 'आता दीपूची मेमेरी गेल्याचं दाखवू नका प्लिज', अशी विनंती केली आहे. एका युझरने म्हटलंय, 'फक्त तिची memory नका घालवू. असं झाल तर मालिका अजून ताणतील'. दीपू शुद्धीवर आल्यानंतर मालिकेच्या पुढच्या भागात काय होणार हे पाहणे इंट्रेस्टिंग ठरणार आहे.  कोमातून बाहेर आलेल्या दीपूला सर्व आठवेल का? की टिपीकल कथानकानुसार दीपूचा स्मृर्तीभंश होईल? तसेच सानिकानेच दीपूला ढकललं हे सत्य दीपिकाचं सर्वांना सांगेल? या सगळ्यां प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी मन उडू उडू झालं मालिका पाहणे महत्त्वाचं ठरेल.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Marathi actress, Marathi entertainment, TV serials, Zee Marathi, Zee marathi serial

  पुढील बातम्या