• Home
  • »
  • News
  • »
  • entertainment
  • »
  • KBC 13: महिलेने बिग बीना सांगितली घरची व्यथा; पतीने पाठवली कायदेशीर नोटीस; जाणून घ्या नेमकं प्रकरण

KBC 13: महिलेने बिग बीना सांगितली घरची व्यथा; पतीने पाठवली कायदेशीर नोटीस; जाणून घ्या नेमकं प्रकरण

Amitabh Bachchan

Amitabh Bachchan

स्पर्धकांशी आपल्या खास शैलीत संवाद साधत त्यांना खेळायला प्रोत्साहन देणाऱ्या बिग बी अमिताभ बच्चन यांना भेटणं हीच इथं येणाऱ्या प्रत्येक स्पर्धकासाठी एक पर्वणी असते.

  • Share this:
 मुंबई, 24 सप्टेंबर-  बिग बी अमिताभ बच्चन (Big B Amitabh Bachchan) यांच्या सूत्रसंचलनामुळे यावेळच्या ‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crore Pati--KBC-13) या कार्यक्रमाचे तेरावे पर्वही प्रसिद्धीची नवनवी शिखरे काबीज करत आहे. स्पर्धकांशी आपल्या खास शैलीत संवाद साधत त्यांना खेळायला प्रोत्साहन देणाऱ्या बिग बी अमिताभ बच्चन यांना भेटणं हीच इथं येणाऱ्या प्रत्येक स्पर्धकासाठी एक पर्वणी असते. त्यामुळे अनेकदा स्पर्धक काहीही रक्कम जिंकता आली नाही तरी अमिताभ बच्चन यांच्यासमोर बसता आले, त्यांच्याशी बोलता आले यामुळे भारावून जातात. स्वत:ला भाग्यवान समजतात. स्पर्धकांचा आणि प्रेक्षकांचाही या शोला उदंड प्रतिसाद मिळत असतानाच सध्या हा कार्यक्रम एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. सोनी टीव्ही वाहिनीवरील या प्रसिद्ध रिअॅलिटी शोमध्ये आपली बदनामी झाल्याचा आरोप करत एका पतीनं (Husband) सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला (Sony Pictures Network Private Limited) चक्क कायदेशीर नोटीस (Legal Notice) पाठवली आहे. अमर उजाला डॉट कॉमनं दिलेल्या वृत्तानुसार, विनय खरे (Vinay Khare) यांनी सोनी टीव्हीला ही नोटीस पाठवली आहे. 20 सप्टेंबर रोजी विनय खरे यांनीच या कायदेशीर नोटीसचा फोटो आपल्या ट्विटर अकाउंटवर (Tweeter Account) पोस्ट करत या प्रकरणाची माहिती दिली. ‘माझ्या पत्नीने या कार्यक्रमात घटस्फोटाचे प्रकरण न्यायालयात असताना माझी बदनामी केली आहे म्हणून मी कायदेशीर नोटीस पाठवली, असं विनय खरे यांनी त्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यांनी आपल्या पत्नीलाही बदनामीसाठी (Defamation) कायदेशीर नोटीसही पाठवली आहे. (हे वाचा:Bigg Boss 15: सलमान खानच्या शोमध्ये या 5 नावांची एन्ट्री झाली कन्फर्म; पाहा LIST) विनय खरे यांची पत्नी श्रद्धा खरे (Shraddha Khare) गेल्या महिन्यात ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये आल्या होत्या. त्यावेळी शोमध्ये अमिताभ बच्चन यांच्याशी संवाद साधताना श्रद्धा खरे यांनी आपल्या पतीवर घरगुती हिंसाचाराचा (Domestic Violence) आरोप केला होता. आपल्या पतीने आपल्या इच्छा आकांक्षांना, स्वप्नांना कधीच पाठिंबा दिला नाही. त्यांच्याकडून होणाऱ्या घरगुती हिंसाचारातून कशी सुटका करून घेतली याबाबत त्यांनी सांगितले होते. यातून सुटका करून घेण्यासाठी अखेर आपण घटस्फोट (Divorce) घेण्याचा निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. या कार्यक्रमात त्या फक्त दहा हजार रुपये जिंकू शकल्या होत्या. (हे वाचा:Shahrukh Khan चं नाव 'इंडियन साईन लँग्वेज डिक्शनरी'त सामील; PM Modi नी केलं...) सोनी टीव्हीला कायदेशीर नोटीस पाठवण्याबाबत एका पोर्टलशी बोलताना विनय खरे म्हणाले की, ‘एखादे चॅनेल आपल्या पत्नीचे मत एकतर्फी कसे प्रसारित करू शकते?. समजा, मी एक दहशतवादी आहे आणि माझ्याविरोधात खटला सुरू आहे, मी एक कथा सांगण्यास सुरुवात करतो जी राष्ट्रीय हिताच्या विरोधात आहे तर केबीसी (KBC) त्याचे प्रसारण करेल का? असा सवाल त्यांनी केला आहे. पोर्टलच्या माध्यमातून विनय खरे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अमिताभ बच्चन यांच्यापर्यंतही पोहोचण्याचा प्रयत्न केला होता.
First published: