मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /मन झालं बाजिंद मालिकेतील अभिनेत्रीच्या पतीचे निधन, फोटो पोस्ट करत म्हणाली...

मन झालं बाजिंद मालिकेतील अभिनेत्रीच्या पतीचे निधन, फोटो पोस्ट करत म्हणाली...

मन झालं बाजींद

मन झालं बाजींद

झी मराठीवरील मन झालं बाजींद मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी या मालिकेतील कलाकारांना आजही प्रेक्षक मिस करताना दिसतात. या मालिकेतील एका अभिनेत्रीच्या पतीचे निधन झाल्याचे समोर आलं आहे.

मुंबई, 25 मे- झी मराठीवरील मन झालं बाजींद मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी या मालिकेतील कलाकारांना आजही प्रेक्षक मिस करताना दिसतात. या मालिकेतील एका अभिनेत्रीच्या पतीचे निधन झाल्याचे समोर आलं आहे. सोशल मीडिया पोस्ट करत या अभिनेत्रीनं दु:खद बातमी शेअर केली आहे.

मन झालं बाजींद मालिकेत फुई आजीची भूमिका लोकप्रिय झाली. ज्येष्ठ अभिनेत्री कल्पना सारंग यांनी ही भूमिका साकारली. कल्पना सारंग यांचे पती रमेश सारंग यांचं दुःखद निधन झालंय.

कल्पना सारंग यांनी मराठी तसेच हिंदी मालिका, चित्रपटांध्ये काम केले आहे. त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी भाषिक नाटकांतून काम केले आहे. काही रिऍलिटी शोच्या प्रोमोमध्ये देखील त्या झळकल्या आहेत. रायजिंग स्टार या रिऍलिटी शोच्या प्रोमोमध्ये रणवीर सिंग सोबत त्यांना काम करण्याची संधी मिळाली होती.

15 ते 16 व्यावसायिक जाहिरातीत केले आहे काम

कल्पना सारंग यांनी 15 ते 16 व्यावसायिक जाहिरातीतूनही प्रेक्षकांसमोर आल्या आहेत. शॉर्टफिल्म, आगरी सिंघम आणि डॅम्बिस म्हातारी, झी मराठीवरील भागो मोहन प्यारे, द परफेक्शनिस्ट, इन्स्पेक्टर चिंगम अशा विविध माध्यमातून आजवर त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या आहेत.

टाइमलेस ब्युटी स्पर्धेत देखील दर्शवला आहे सहभाग

कल्पना सारंग यांनी टाइमलेस ब्युटी स्पर्धेत देखील सहभाग दर्शवला होता. त्यांनी मन झालं बाजींद या मराठी मालिकेत फुई आजीची भूमिका साकारताना दिसल्या होत्या.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Marathi entertainment