रियामुळे कोल्हापूरच्या व्यक्तीला सहन करावा लागतोय शिवीगाळ, वाचा काय आहे कारण

रियामुळे कोल्हापूरच्या व्यक्तीला सहन करावा लागतोय शिवीगाळ, वाचा काय आहे कारण

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी सुरू असलेल्या तपासादरम्यान अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र या या एकंदरित प्रकरणानंतर कोल्हापूरमधील एका व्यक्तीवर मोबाइल बंद ठेवण्याची वेळ आली आहे.

  • Share this:

मुंबई, 12 ऑगस्ट  : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणाचा (Sushant Singh Rajput Death) तपास दीड महिन्याहून अधिक कालावधीपासून सुरू आहे. याप्रकरणी मनी लाँड्रिंगच्या अँगलने ईडीकडून तपास सुरू आहे. दरम्यान सुशांतच्या मृत्यूनंतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिच्या अडचणीत वाढ झाली आहे. केवळ या तपास यंत्रणांच्या चौकशीच्या फेऱ्यातच ती अडकली नाही, तर सुशांतच्या चाहत्यांकडून देखील तिला रोष पत्करावा लागला आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात रियाला ट्रोल केले जात आहे. दरम्यान या एकंदरित प्रकरणानंतर कोल्हापूरमधील एका व्यक्तीवर मोबाइल बंद ठेवण्याची वेळ आली आहे. या व्यक्तीचा मोबाइल नंबर रियाच्या नंबरशी मिळताजुळता असल्याने लोकं त्यांना फोन करून संताप व्यक्त करत आहेत.

(हे वाचा-सुशांतच्या डायरीची 15 पानं आली समोर; बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंतचा केला होता प्लान)

रियावर सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप सुशांतच्या वडिलांनी केला आहे. त्यानंतर सुशांतच्या चाहत्यांनी सोशल मीडियावरून तिच्यावर खूप टीका केली आहे. मात्र केवळ मोबाइल नंबर काहीसा एक सारखा असल्यामुळे या रागाचा सामना कोल्हापूरमधील व्यक्तीला करावा लागत आहे. नवभारत टाइम्सने याबाबत वृत्त दिले आहे. दरम्यान या बातमीनुसार सदर व्यक्तीस 30-40 फोन कॉल्स आले असून, फोनवरील व्यक्तींनी त्यांना शिवीगाळ देखील केला आणि अपशब्द देखील वापरेल. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'सुशांतच्या मृत्यूनंतर एका न्यूज चॅनेलवर रियाचा नंबर दाखवण्यात आला होता. त्यांच्या आणि रियाच्या नंबरमध्ये केवळ एका अंकाचा फरक आहे. त्यानंतर काही अज्ञात व्यक्तींनी मला फोन करण्यास सुरुवात केली'. त्यांनी अशी देखील माहिती दिली की, त्यांना मिळालेले मेसेज देखील द्वेषपूर्ण होते. त्यामुळे शेवटी वैतागून मोबाइल नंबर बंद करून ठेवला आहे.

(हे वाचा-'आशुडा, नैराश्याला हरवण्याच्या जवळ होतो', पतीच्या मृत्यूनंतर मयुरीची भावुक पोस्ट)

दरम्यान याप्रकरणी सीबीआयच्या युनिफाइड चौकशीसाठी दाखल जनहित याचिकेवर गुरुवारी सर्वोच्च न्यायायलामध्ये सुनावणी होणार आहे.य या जनहित याचिकेमध्ये (PIL) असे म्हटले आहे की, मुंबई पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या तपासाच्या पद्धतीमुळे संपूर्ण देश स्तब्ध आहे. भाजप नेता आणि वकील अजय अग्रवाल यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती एसए बोबडे, जस्टिस एएस बोपन्ना आणि जस्टिस व्ही. रामासुब्रमणियन यांच्या त्रीसदस्यीय पीठासमोर ही सुनावणी होणार आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: August 13, 2020, 9:50 AM IST

ताज्या बातम्या