S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

जेव्हा शाहरूख ममता बॅनर्जींच्या पाया पडतो...

बंगालचा ब्रँड अँबेसिडर शाहरूख खान कोलकत्ता फिल्म फेस्टिवलसाठी आला होता. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि किंग खान यांचं एकमेकांशी असलेलं नातं एकदम गहिरं आहे. त्यामुळे शाहरूखला विमानतळावर सोडायला खुद्द ममता दीदी गेल्या होत्या.

Sonali Deshpande | Updated On: Nov 17, 2017 01:09 PM IST

जेव्हा शाहरूख ममता बॅनर्जींच्या पाया पडतो...

17 नोव्हेंबर : तुम्ही कितीही मोठे स्टार्स असा, पण जेव्हा तुम्ही एखाद्या प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यासोबत प्रवास करता, तेव्हा छोट्या गाडीत बॅकसिटवर बसणं तुमच्यासाठी सहज असतं. किंग खान शाहरूखनंही तेच केलं.

बंगालचा ब्रँड अँबेसिडर शाहरूख खान कोलकत्ता फिल्म फेस्टिवलसाठी आला होता. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि किंग खान यांचं एकमेकांशी असलेलं नातं एकदम गहिरं आहे. त्यामुळे शाहरूखला विमानतळावर सोडायला खुद्द ममता दीदी गेल्या होत्या. तेही स्वत:ची गाडी घेऊन. एरवी महागड्या कार्स वापरणारा शाहरूख खान ममता बॅनर्जींसोबत सँट्रोमध्ये मागच्या बाजूला बसला होता.ममतादीदी शाहरूखच्या सुरक्षेची काळजी घेत होती. गाडीतून उतरल्यावर शाहरूखनं ममताजींना वाकून नमस्कारही केला. हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय.

आपल्या बिझी शेड्युलमधून ममतदीदींनीही वेळ काढला हे विशेष. दोन दिग्गज व्यक्तींचं हे नम्र वागणं लोकांचं मन जिंकून गेलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 17, 2017 01:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close