• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • 'त्या' फोटोंमुळे ममता कुलकर्णीच्या चाहत्यांना पुन्हा लावलं वेड; एकेकाळी टॉपलेस फोटोशूटमधून उडाली होती खळबळ

'त्या' फोटोंमुळे ममता कुलकर्णीच्या चाहत्यांना पुन्हा लावलं वेड; एकेकाळी टॉपलेस फोटोशूटमधून उडाली होती खळबळ

ममता आज बॉलिवूडपासून दूर असली तरी तिची जादू आजही असंख्य रसिकांच्या मनावर कायम आहे, हे नक्की.

 • Share this:
  मुंबई, 23 ऑक्टोबर : सध्या बॉलिवूडमध्ये (Bollywood) शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्याचं प्रकरण गाजतं आहे. या प्रकरणावरून अंडरवर्ल्डशी नातं असणाऱ्या काही कलाकारांची चर्चा सुरू झाली. त्यात एक नाव होतं ममता कुलकर्णीचं (Mamata Kulkarni). बॉलिवूडमध्ये बोल्ड आणि सेक्स सिम्बॉल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठमोळ्या ममता कुलकर्णीनं 90चं दशक चांगलंच गाजवलं होतं. तिचे अंडरवर्ल्डशी संबध असल्याची चर्चा होती. आपल्या बेधडक वागण्यानं ती नेहमीच चर्चेत असे. आपल्या सौंदर्यानं, स्टायलिश आणि ग्लॅमरस लूकने तिनं लाखो लोकांना घायाळ केलं होतं. स्टारडस्ट मासिकासाठी तिनं टॉपलेस फोटोशूट करून एकच खळबळ माजवली होती; मात्र तिचं करिअर अगदी यशाच्या शिखरावर असताना अचानक ती बॉलिवूडमधून गायब झाली. अधूनमधून कारणपरत्वे तिची चर्चा होते. काही काळापूर्वी तिने आपण संन्यस्त जीवन जगत असल्याचं एका मुलाखतीत सांगितलं होतं. ती सोशल मीडियावर सक्रिय नाही. त्यामुळे तिच्याबद्दल फार कमी माहिती मिळते. अलीकडेच ममता कुलकर्णीच्या फॅन पेजवर तिचे अनेक लेटेस्ट फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा ममता कुलकर्णी चर्चेत आली आहे. 'एनडीटीव्ही'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. हे ही वाचा-Amala Paul ने नागार्जुनसोबत लिपलॉक सीन देण्यासाठी ठेवली होती विचित्र अट ममता आता 49 वर्षांची असली तरी आजही ती पूर्वीसारखीच सुंदर दिसते. आजही तिच्या चाहत्यांची (fans) संख्या करोडोंच्या घरात आहे. ममता कुलकर्णीने तिच्या कारकिर्दीत अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये आणि त्या काळातल्या सर्व बड्या कलाकारांसोबत काम केले आहे. करण-अर्जुन (Karan -Arjun) या चित्रपटात सलमान खानसोबत (Salman Khan) तिची जोडी चांगलीच जमली होती. या चित्रपटातली दोघांची अनेक गाणी आजही प्रेक्षकांना आवडतात. ममता कुलकर्णीचा जन्म 20 एप्रिल 1972 रोजी एका मराठी कुटुंबात झाला. 1992 मध्ये 'तिरंगा' चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर 'आशिक आवारा', 'वक्त हमारा है', 'क्रांतीवीर', 'करण अर्जुन', 'सबसे बडा खिलाडी' आणि 'बाजी', 'घातक', 'चायना गेट' अशा अनेक चित्रपटांमध्ये तिनं काम केलं. तिची अनेक गाणी आजही लोकांच्या ओठावर आहेत. ही गाणी कानावर पडली की तिची आठवण ताजी होते. 'मैं तो पिया की गली..', 'माफ कर दो राणा जी,' 'भांगडा पा ले, आजा आजा', 'एक मुंडा मेरी उम्र दा' इत्यादी तिची गाणी आजही रसिकांना थिरकायला लावतात. 2002 मध्ये 'कभी तुम कभी हम' या चित्रपटानंतर ममताने अचानक बॉलिवूडला अलविदा केला.
  तिनं ड्रग माफिया विक्की गोसावीबरोबर लग्न केल्याची बातमी होती. काही वर्षं ती दुबईत होती; पण तिनं नेहमीच या वृत्ताचा इन्कार केला आहे. आता ती केनियामध्ये (Keniya) वास्तव्य करत असून, तिने 'ऑटोबायोग्राफी ऑफ एन योगिन' नावाचं पुस्तकही लिहिलं आहे. 'मी देवासाठी या जगात आले आहे,' असं ती सांगते.
  First published: