Home /News /entertainment /

धार्मिक नावेत फोटोशूट पडलं भारी; या चुकीमुळे अभिनेत्रीला झाली अटक

धार्मिक नावेत फोटोशूट पडलं भारी; या चुकीमुळे अभिनेत्रीला झाली अटक

अभिनेत्री मित्र मैत्रिणींसोबत प्रसिद्ध अरनमुला मंदिराच्या पल्लीयोदमला फिरण्यासाठी गेली होती. यावेळी तिने तिथे असलेल्या धार्मिक नौकेत फोटोशूट केलं तही चप्पल घालून. त्यानंतर मोठा विवाद निर्माण झाला होता.

  मुंबई  12 सप्टेंबर : अभिनेत्री अनेकदा त्यांच्या फोटोशूट मुळे चर्चेत राहतात. कधी त्यांच्या हटके अंदाजमुळे तर कधी लोकप्रियतेमुळे पण केरळ मध्ये एका अभिनेत्रीला फोटोशूट करणं महागात पडलं आहे. मल्याळम अभिनेत्री निमिषा (Malyalam actress Nimisha)  हिला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान पोलिसांनी तिची चौकशी केल्यानंतर तिला अटक केली. तसेच तिला फोटोशूट मध्ये मदत करणारा मित्र या दोघांचेही स्टेटमेंट पोलिसांनी घेतले आहेत. त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली होती. दरम्यान बुधवारी निमिषाकडून पोलीस स्थानकात एक तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीत निमिशा ने सांगितल होत की, तिला फोन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर धमक्या दिल्या जात आहेत. तसेच शिव्याही दिल्या जात आहेत. अज्ञात लोकांविरुद्ध ही तक्रार करण्यात आली होती. तसेच तिने सांगितलं की या प्रकरणात तिच्या लक्षात आलं की तिच्याकडून चूक झाली आहे. तिने मंदिराच्या नियमांच उल्लंघन केलं आहे. व धार्मिक नावेत चप्पल घालून फोटोशूट केलं आहे.  त्यानंतर तिने सोशल मीडियावरून तिचे फोटो ही हटवले आहेत.

  मैत्रीण PV सिंधूसोबत दिसली दीपिका; सिंगल फोटो देण्यास दिला नकार

  निमिषा तिच्या काही मित्र मैत्रिणींसोबत प्रसिद्ध अरनमुला मंदिराच्या पल्लीयोदमला फिरण्यासाठी गेली होती. यावेळी तिने तिथे असलेल्या धार्मिक नौकेत फोटोशूट केलं तही चप्पल घालून.  तिने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते त्यानंतर मोठा विवाद निर्माण झाला होता. या फोटोंना पाहून लोक  निमिषासोबत अभद्र व्यवहार करू लागले, त्यानंतर अभिनेत्रीने हे फोटो काढून टाकले मात्र हे प्रकरण इथेच संपल नाही.

  'Mimi'च्या यशानंतर क्रिती सेननने घेतली ब्रँड न्यू Mercedes ; किंमत ऐकून जाल चक्रावून

  पुथुकुलंगरा पल्लीयोदम सेवा समितीने निमिषा विरुद्ध  मंदिराच्या नियमांच उल्लंघन करने  आणि धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी तिरुवल्ला पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. त्यानंतर तिचं स्टेटमेंट घेतल्यानंतर तिला अटक करण्यात आली. पण नंतर तिला तिच्या मित्रासह जामिनावर सोडण्यात आलं.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Entertainment, South actress

  पुढील बातम्या