• Home
  • »
  • News
  • »
  • entertainment
  • »
  • कमबॅक करताच Mallika Sherawat चा धक्कादायक खुलासा; बॉलिवूडमधील सत्य आणलं समोर

कमबॅक करताच Mallika Sherawat चा धक्कादायक खुलासा; बॉलिवूडमधील सत्य आणलं समोर

अभिनेत्री मल्लिका शेरावत (Mallika Sherawat) ‘नकाब’ या वेबसीरिजमधून इंडस्ट्रित परतली आहे.

  • Share this:
मुंबई, 16 सप्टेंबर : बॉलिवूड आणि कास्टिंग काउच (Casting couch) हे समीकरण नवं नाही. मोठमोठ्या अभिनेत्रींना यातून जावं लागलं आहे. बॉलिवूडमध्ये आपल्या आयटम साँग्जसाठी प्रसिद्ध असणारी मल्लिका शेरावत (Mallika Sherawat) हिनेही आपल्यासोबत असे प्रकार झाल्याचं आता सांगितलं आहे. विशेष म्हणजे, असे प्रकार कसे टाळता येतील याबाबतही तिने तरुणींना सल्ला (Mallika on casting couch) दिला आहे. मल्लिकाने आपल्या करिअरमध्ये कित्येक आयटम साँग्ज, बोल्ड आणि इंटिमेट सीन्स दिले आहेत. याबद्दल तिला बऱ्याच वेळा ट्रोलही केलं गेलं आहे. तिच्याबद्दल सोशल मीडियावर बऱ्याच उथळ चर्चा होत राहतात; मात्र या सगळ्यातूनही तिने आपल्या कामामध्ये सातत्य राखलं आहे. सध्या ती तिच्या ‘नकाब’ (Mallika Sherawat web series) या आगामी वेबसीरिजचं प्रमोशन करण्यात व्यग्र आहे (Nakaab web series) . यासाठीच्या एका मुलाखतीत तिने कास्टिंग काउचबद्दलचा (Mallika Sherawat casting couch) आपला अनुभव शेअर केला. 'झी न्यूज'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. हे वाचा - Raj Kundra Case: शिल्पाचं स्टेटमेंट आलं समोर, म्हणाली 'मी कामात व्यस्त होते,..' मल्लिकाने सांगितलं, की इंडस्ट्रीमध्ये तिची इमेजच अशी होती, ज्यामुळे बरेच पुरुष तिच्यापासून चार हात लांबच राहत. चित्रपट मिळवण्यासाठी आपण कधीही आपल्या मूल्यांचा त्याग केला नाही, असंही तिने सांगितलं. मल्लिकाच्या मते, अशा प्रकारच्या ‘ऑफर’ त्यांनाच दिल्या जातात ज्या तडजोड (Mallika on avoiding casting couch) करण्यास तयार असतात. ती म्हणते, “मलाही अशा प्रकारच्या गोष्टींचा सामना करावा लागला आहे; पण इतर लोक माझ्या फटकळ स्वभावाला घाबरून असत. त्यामुळे अशा प्रसंगांचं प्रमाण कमी राहिलं आहे. मी काही लाजरी-बुजरी मुलगी नव्हते. त्यामुळे कोणी काही बोललं तर मी त्याला तोंडावर उत्तर देत असे. याच्याच भीतीने लोक अशा प्रकारच्या ऑफर घेऊन माझ्याकडे येणं टाळत.” इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काउचची शिकार होणाऱ्या मुलींबाबत मल्लिकाने (Mallika interview on casting couch) आपल्या स्वभावाप्रमाणेच बोल्ड स्टेटमेंट केलं. ती म्हणते, “बऱ्याच वेळा तुम्ही स्वतःच अशा परिस्थितीला कारणीभूत ठरता. ज्या लोकांचा मला त्रास होतो अशांना मी कायमच दूर ठेवत आले आहे. मी कोणत्याही बॉलिवूड पार्टीमध्ये जात नाही. तसंच, कधी एखादा डिरेक्टर किंवा प्रोड्यूसरला रात्री हॉटेल रूममध्ये किंवा ऑफिसमध्ये भेटायला गेले नाही. माझ्या नशिबात जे आहे ते मला मिळेलच अशी मला खात्री होती. त्यामुळे काम मिळवण्यासाठी अशा गोष्टी मी कधीच केल्या नाहीत.” हे वाचा - नुसरत जहाँच्या मुलाच्या जन्मदाखल्याने उघडलं वडिलांचं नाव; पहिल्यांदाच झाला खुलास नकाब वेबसीरिज 15 सप्टेंबरला एमएक्स प्लेयर (MX player) या ओटीटीवर रिलीज झाली आहे. यामध्ये मल्लिकासोबतच ईशा गुप्ता आणि गौतम रोडे यांच्य मुख्य भूमिका आहेत.
First published: